PM मोदींचे मित्र `अब्बास भाई` आहेत तरी कोण? जाणून घ्या...
सोशल मीडियावर अब्बास भाई आहे तरी कोण? असे प्रश्न विचारले जात आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीरा बेन मोदी यांचा शनिवारी 100 वा वाढदिवस होता. यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील घरी पोहोचत आईचे पाय धुवून आशीर्वाद घेतला. त्याचसोबत एक ब्लॉगही लिहला. या ब्लॉगमध्ये त्यांनी आईच्या संघर्षाची कहाणी सांगितली. तसेच लहानपणीचा मित्र अब्बास भाई याचा देखील उल्लेख केला होता. मोदींच्या या मित्राबाबत आता नेटकऱ्यांना उत्सुकता लागली असून सोशल मीडियावर अब्बास भाई आहे तरी कोण? असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात हे अब्बास भाई आहे तरी कोण?
अब्बास बद्दल मोदी ब्लॉगमध्ये काय म्हणाले?
अब्बास हे पंतप्रधान मोदी यांचे मित्र आहेत. लहानपणी ज्यावेळेस वडिलांच्या मित्राचा मृत्यू झाला होता, त्यानंतर पीएम मोदींचे वडील त्यांच्या मित्राच्या मुलाला अब्बासला घरी घेऊन आले होते. अब्बास मोदी कुटुंबात लहानाचा मोठा झाला. मोदींची आई हिरा त्यांच्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करायची असेही ते म्हणाले आहेत.
ईदच्या दिवशी गोडधोड बनवायची
मोदींच्या आई हिराबेन यांनी अब्बास आणि त्यांच्या मुलांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. पीएम मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिले की, 'अब्बास माझ्या घरात राहून, अभ्यास आणि लेखन करत मोठे झाले आहेत. 'सणांच्या वेळी आमच्या आजूबाजूची काही मुलं आमच्या घरी येऊन खायची. माझ्या आईच्या हाताने बनवलेला पदार्थही त्याला खूप आवडायचा. मोदींनी पुढे लिहिले की, 'माझी आई ईदच्या दिवशी अब्बाससाठी जेवण बनवायची. इतरांना आनंदी पाहून माझी आई नेहमी आनंदी असायची. घरातील जागा लहान होती, पण त्याचे मन मोठे होते.
साधू-संताना जेवण द्यायची
मोदी पुढे लिहतात, आमच्या घराभोवती कोणीही साधू-संताना आला तर आई त्यांना घरी बोलावून जेवण द्यायची.या साधू-संतांकडून आई स्वतःसाठी नाही तर आम्हा भावा-बहिणींसाठी आशीर्वाद घ्यायची.माझ्या मुलांमध्ये भक्ती आणि सेवा रुजवण्यासाठी, त्यांना असा आशीर्वाद द्या.
कोण आहेत अब्बास?
अब्बास हे पीएम मोदींचे मित्र आहेत. ते लहानपणी मोदी कुटुंबासोबत राहिले. अब्बास सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. तो तिथे आपल्या मुलासोबत राहतो. अब्बास यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा गुजरातच्या कासिम्पा गावात राहतो, तर लहान मुलगा ऑस्ट्रेलियात राहतो. अब्बास हे गुजरात सरकारच्या अन्न आणि पुरवठा विभागात काम करायचे. पण आता ते निवृत्त झाले आहेत.