नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणात सध्या नाट्यमय हालचाली सुरू आहेत. त्यातही सर्वाधीक राजकीय घडामोडी या नितीश कुमार यांच्या जनता दलामध्ये (यु) घडत आहेत. जनता दलाचे (यु) माजी अध्यक्ष शरद यादव यांना राज्यसभेच्या पक्षनेतेपदावरून हटवत आरसीपी सिंह यांची निवड करण्यात आली. तुम्हाला माहिती आहे का कोण आहेत हे आरसीपी सिंह? ज्यांच्या गळ्यात राज्यसभेच्या पक्षनेतेपदाची माळ पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीपी सिंह यांचे पूर्ण नाव रामचंद्र प्रसाद सिंह असे आहे. नितीश कुमार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आरसीपी सिंह हे जेडीयूच्या कोठ्यातून बिहामधून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करतात. नितीश कुमार येतात त्याच नालंदा जिल्ह्यात राहणारे आरसीपी सिंह हे उत्तर प्रदेशमध्ये आयएएस अधिकारी होते. त्यांनी काही काळ नितीश कुमार यांचे मुख्य सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले आहे.


सद्या ५९ वर्षांचे असलेले आरसीपी सिंह हे कुर्मी समाजातून येतात. प्रशासकीय सेवेत असताना सिंह यांनी उत्तर प्रदेशातील विवीध विभागांमध्ये काम पाहिले आहे. नितीश कुमार यांचे खास अशी त्यांची जनता दलात ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे राज्यसभेत नितीश कुमार यांच्या विश्वासातला आणखी एक चेहरा नेतृत्व करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.