Starbucks : जर तुम्हाला कॉफी प्यायला आणि वेगवेगळ्या ब्रॅंड्सची कॉफी टेस्ट करायला आवडत असेल.मुख्यतः तुम्ही कॉफी प्रेमी असाल तर स्टारबक्सची कॉफी प्यायली नाही असं होणारच नाही. स्टारबक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक व्हरायटीज ऑफ कॉफी मिळतात. कोफी सोबत स्टारबक्स मध्ये बसून कॉफी प्यायल्याचा आनंद हा वेगळाच आहे. बऱ्याच जणांना स्टारबक्सचा मौहोल प्रचंड आवडतो . (starbucks coffee)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टारबक्स आज कॉफी पिणाऱ्यांमध्ये मोठा ब्रँड बनला आहे. आजकाल स्टारबक्स ची कॉफी पिणं फार प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे. दिवसेंदिवस स्टारबक्स ची कॉफी पिणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढतं आहे. स्टारबक्स आजमितीला जगातील नामांकित लक्झरी ब्रॅण्डपैकी एक आहे, लक्झरी बेव्हरेज ब्रँड म्हणून जगभरात स्टारबक्स ओळखलं जातं. 


आजपर्यंत संपूर्ण जगात स्टारबक्स कॉफीच्या ओउटलेट्सचा विचार केला तर 84 देशांमध्ये 34630 स्टोअर्स आहेत. जवळपास 4 लाख कर्मचारी आज तारखेला स्टारबक्समध्ये कॉफी सर्व्ह करतात. 


स्टारबक्सची कशी झाली सुरवात 


3 मित्रांनी एकत्र येऊन कॅफे सुरु करण्याची योजना आखली आणि गॉर्डन बोकर, जेव शिएगल आणि गेराल्ड बाल्डविन यांनी 30 मार्च 1971 साली एक छोटासा कॅफे सुरु केला. सुरवातीला त्यांनी कॅफेमध्ये हाय क्वालिटी बीन्स विकायला सुरवात केली होती. हळू हळू त्यांच्या कॉफी बीन्स लोकांना आवडू लागल्या आणि मागणी वाढतं गेली. यानंतर त्यांनी पाहिलं कॉफी बिन स्टोअर  सीएटन मध्ये सुरु केलं. 


स्टारबक्सच्या संस्थापकांनी सुरवातीला स्टोअरला नाव काय द्यायचं यासाठी आर्टिस्ट 'टेरी ला हायर केलं , खूप नाव सुचवल्यांनतर मॉबी -डिक नॉवेलमधूनच स्टारबक्स हे नाव सर्वाना आवडलं आणि इथून सुरु झाला स्टारबक्सचा प्रवास. 


कॉफी बीन्स लोकांना आवडू लागल्यावर पहिल्या वाहिल्या कॉफी शॉपची सुरवात करण्यात आली. लोकांनी या कॉफी शॉपला खूप पसंती दर्शवली. आणि पाहता पाहता 1 वर्षात स्टारबक्सने जगभरात १४८ आउटलेट्स सुरु केले. 


स्टारबक्सच्या लोगोची आहे कहाणी


स्टारबक्सच्या लोगोमध्ये दिसणारी ही तरुणी एक पौराणिक पात्र आहे. ती एक काल्पनिक पात्र आहे,  त्यानुसार तिला सायरन म्हटलं जातं. सायरन म्हणजे रहस्यमयी पात्र आहे त्यामुळे स्टारबक्ससुद्धा एक रहस्य आहे जोपर्यंत तुम्ही ती कॉफी पीत नाही तोवर तुम्हाला समजणार नाही त्यात काय खास आहे. आणि अश्या पद्धतीने हा लोगो फायनल करण्यात आला. 



आतापर्यंत चार वेळा बदलला लोगो 


स्टारबक्स कंपनीने आतापर्यंत ब्रॅंडिंगवर सर्वात जस्ट लक्ष केंद्रित केलं. कंपनीने आजपर्यंत चार वेळा लोगो बदलला. पूर्वी ही सायरन तरुणी ब्राउन रंगाच्या लोगोमध्ये होती. तो फायनली बदलून आता हिरव्या रंगात आहे. आणि आज हा ब्रँड त्याच्या लोगोमुळे ओळखला जातो.