Gautam Adani : रुग्णवाहिका ड्रायव्हर ते इलॉन मस्कशी पंगा...अदानींची पोलखोल करणारे Nathan Anderson आहेत तरी कोण?
Gautam Adani Group Hindenburg Research : नॅथन अँडरसनने (Nathan Anderson) इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक (Ambulance driver) म्हणून काम केलं होतं. प्रचंड दडपणाखाली काम करायला मजा येते, असं नॅथम सांगतो.
Adani Group, Gautam Adani : अमेरिकेच्या शॉर्ट-सेलिंग फर्म असलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) नकारात्मक अहवालामुळे सध्या भारतीय मार्केटमध्ये मोठी उलथापाटल झाल्याचं पहायला मिळत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मालकीच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये (Share Market) मोठी घसरण झाल्याचं दिसून येतंय. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल नेमका काय होता? तसेच सध्या चर्चेत असलेले नॅथम अँडरसन (Nathan Anderson) नेमके आहेत तरी कोण?, असा सवाल विचारला जातोय.
अहवालानंतर अदानी समूहाला (Adani Group) 45 हजार कोटींचा नुकसान सहन करावं लागतंय. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लक्षणीय घट झाली. बाजार खुला होताच अदानी समूहाचे शेअर्स 19 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे आता शेअर बाजारात एकच चर्चा होताना दिसत आहे. (Who is Nathan Anderson Who is behind Hindenburg the company that is shorting Gautam Adani Group)
Nathan Anderson आहेत तरी कोण?
नॅथन अँडरसनने इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक (Ambulance driver) म्हणून काम केलं होतं. प्रचंड दडपणाखाली काम करायला मजा येते, असं नॅथम सांगतो. हिंडनबर्गने 2017 पासून किमान 36 कंपन्यांमध्ये संभाव्य गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. गेल्या वर्षी, Twitter वर लहान आणि नंतर लाँग पोझिशन घेतली. त्यानंतर त्यांनी थेट इलॉन मस्क (Elon Musk) यांच्याशी पंगा घेतला आणि मस्कविरुद्ध पैज लावली होती. त्यानंतर आता त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या व्यापाऱ्याविरुद्ध दंड थोपटले आहेत.
नॅथन अँडरसनने कनेक्टिकट विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवी मिळवल्यानंतर अनेक ठिकाणी काम केलं. फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंक, डेटा कंपनीमध्ये काम केलंय. तिथं त्यांचं काम गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांशी संबंधित होतं. त्यानंतर Hindenburg ची संकल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्याने आपलं काम सुरू केलं.
Hindenburg चा आरोप काय?
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात (hindenburg report on adani) अदानी समूहात सर्व काही ठीक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला असल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या काही दशकांपासून त्यांच्याकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याचा आरोप देखील (hindenburg research report) करण्यात आलाय.
रिसर्चने आतापर्यंत अनेक कंपन्यांचा पर्दाफाश हिंडेनबर्ग रिसर्चची स्थापना 2017 मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली होती. हिंडेनबर्ग रिसर्च ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे. इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषणात्मक अभ्यास करणारी ही संस्था आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मँचेस्टर टाऊनशिपमध्ये 6 मे 1937 रोजी झालेल्या हायप्रोफाइल हिंडेनबर्ग एअरशिप क्रॅशवरून (hindenburg disaster) कंपनीचं नाव देण्यात आलं होतं.
दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्च कोणत्याही कंपनीत होणाऱ्या गडबडीवर रिसर्च करते आणि अहवाल प्रकाशित करते. मानवनिर्मित आपत्तींवर काम करत असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. खासंबंधी अनियमितता, गैरव्यवस्थापन आणि अघोषित संबंधित व्यवहार यावर नजर ठेवण्याचं काम ही संस्था करते.