भारतीय नौसेनेची पहिली महिला पायलट शुभांगी स्वरूप बद्दल जाणून घ्या या ५ खास गोष्टी
भारतीय नौसेनेत पहिल्यांदा महिला पायलटची नियुक्ती झाली आहे. कोण आहे जाणून घ्या?
केरळ : भारतीय नौसेनेत पहिल्यांदा महिला पायलटची नियुक्ती झाली आहे. कोण आहे जाणून घ्या?
उत्तर प्रदेशची शुभांगी स्वरूप लवकरच मेरीटाइम रिकानकायसन्सचे विमान उडवताना दिसत आहे. यासोबतच नवी दिल्लीचा आस्था सेगल, पुड्डूचेरीची रूपा ए आणि केरळती शक्ती माया एस यांना नौसेनेच्या नेवल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट शाखेत देशातील पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान मिळालेला आहे.
चारही महिलांनी बुधवारी एका कार्यक्रमात एझीमाला नौसेना अकादमीत नेवल ओरियन्टेशन कोर्स पास करून पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात नौसेना प्रमुख एडमिरल सुनील लांबा देखील उपस्थित होते. त्यावेळी शुभांगी स्वरूपने सांगितले की, मला माहित आहे हा आयुष्यातील फक्त चांगला क्षण नसून खूप मोठी जबाबदारी आहे.
दक्षिणी नेवल प्रवक्ता कमांडर श्रीधर वॉरिअरने सांगितले की, शुभांगी स्वरूप ही नौसेनेची पहिली पायलट आहे. मात्र नौसेनेच्या एविएशन ब्रांचमधील नियंत्रण अधिकारी आणि विमान पर्यवेक्षक म्हणून अनेक महिला कार्यरत आहेत.
शुभांगी स्वरूपमधील ५ खास गोष्टी
१) शुभांगी स्वरूप मूळ उत्तर प्रदेश बरेलीतील आहे.
२) शुभांगीने हैदराबाद वायू सेना अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे. जेथे सेना, नौसेना आणि वायू सेनाच्या पायलटचा प्रशिक्षण दिले जाते.
३) शुभांगीचे वडिल ज्ञान स्वरूप हे देखील नौसेनेतील अधिकारी आहे.
४)शुभांगी लवकरच मेरीटाइम रिकानकायसन्समध्ये विमान उडवताना दिसेल.
५) कमांडर वॉरियरने सांगितले की, सर्व चारही महिला अधिकाऱ्यांना ड्युटीवर तैनात करण्याअगोदर काही खास शाखांचे देखील शिक्षण दिले जाणार आहे.