UPSC Result 2024: युपीएससीच्या निकालांची घोषणा होताच अनेक उमेदवारांचं सरकारी सेवेत दाखल होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आयएएस, आयपीएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र मेहनत करणाऱ्या अनेकांची आज स्वप्नपूर्ती झाली आहे. आयएएस हे पद आपल्या देशात फार प्रतिष्ठित मानलं जातं. या पदाला एक वेगळा मान, सन्मान आहे. त्यामुळेच देशसेवा करण्याच्या उद्देशाने ही खडतर परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कित्येक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. या परीक्षेशी फक्त उमेदवार नाही तर संपूर्ण कुटुंब भावनात्मकपणे जोडलेलं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील कित्येक तरुण-तरुणी युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या तरुणपातील मोठा काळ खर्ची घालतात. यातील काहींचं स्वप्न पूर्ण होतं, तर काहींची मात्र आयुष्यभरासाठी निराशा होते. आयएएस जिल्ह्यापासून ते राज्य आणि केंद्र स्तरावर मोठे अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्या पदासह मोठी जबाबदारी आणि पॉवरही येते. 


UPSC Result 2024: IAS होण्यासाठी किती रँकिंग लागते? General आणि OBC मध्ये किती फरक?


 


आयएएस होण्याचा प्रवास हा फार खडतर असते. यासाठी तुम्हाला युपीएससी नागरी सेवा अंतर्गत प्रिलिअम्स, मेन्स आणि मुलाखत हे टप्पे पार करावे लागतात. हे टप्पे अत्यंत कठीण मानले जातात. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना LBSNAA मध्ये प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयएएस म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते. 


सुरुवातीला ते उपविभागीय दंडाधिकारी (SDM) होतात, नंतर त्यांना जिल्हा दंडाधिकारी (DM) पदावर प्रमोट केलं जातं. डीएम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रशासकीय अधिकारी असतो. पण तुम्ही कधी आयएएस अधिकाऱ्यांचा प्रमुख म्हणजे बॉस कोण असतो याचा विचार केला आहे का? ते कोणाला रिपोर्ट करतात? माहिती नसेल तर मग जाणून घ्या. 



IAS अधिकाऱ्यांचा बॉस कोण असतो?


IAS अधिकाऱ्यापेक्षा कॅबिनेट सेक्रेटरी हे पद मोठं असतं. भारत सरकारचे ते सर्वोच्च रँकिंग अधिकारी असतात. केंद्र स्तरावर त्यांना आयएएस अधिकाऱ्यांचा बॉस मानलं जातं. कॅबिनेट सेक्रेटरी थेट पंतप्रधानांकडे रिपोर्ट करत असतात. तसंच राज्य स्तरावर कॅबिनेट सेक्रेटरींप्रमाणे चीफ सेक्रेटरी सर्वात मोठे अधिकारी असतात. हे राज्याचे सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ आयएएस असतात. राज्य स्तरावर त्यांना आयएएस अधिकाऱ्यांचं प्रमुख मानलं जातं. 



आदित्य श्रीवास्तव टॉपर


युपीएससी 2024 च्या निकालांची घोषणा झाली आहे. आदित्य श्रीवास्तवने देशभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये डी अनन्या रेड्डी पहिली आली आहे. upsc.gov.in वर निकाल अपलोड करण्यात आले आहेत. 


आदित्य श्रीवास्तव टॉपर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनिमेशन प्रधान दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये डी अन्यया रेड्डी टॉपर ठरली आहे. मागील दोन वर्षांपासून युपीएससी परीक्षेत मुलगी बाजी मारत पहिला क्रमांक पटकावत होती. पण यावर्षी मुलाने बाजी मारली आहे. 


युपीएससी परीक्षेत टॉप करणारा आदित्य श्रीवास्तव मुळचा उत्तर प्रदेशच्या लखनऊचा आहे. त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केलं आहे. युपीएससी मेन्समध्ये त्याने ऑप्शनलमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर विषय निवडला होता. आदित्यने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं आहे.