दिल्ली : गेल्या दीड वर्षांपासून आपला देश कोरोनाव्हायरसच्या विषाणूशी सतत लढत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा ही परिणाम सगळ्यांनी अनुभवला आहे ज्यामुळे देशातील काही राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली. कारण त्यावेळेला देशात दररोज कोरोनाचे नवीन प्रकरणं समोर येत होती ज्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4.5 लाखांच्या पुढे गेली आणि दररोज 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ लागला ती खरोखरचं खूप वाईट परिस्थिती होती. परंतु आता ही परिस्थिती सुधारताना दिसत असली तरी सगळ्यांनी काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लसीकरण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. हे पाहता भारतासह जगातील सर्व देशांमध्ये जलद लसीकरण मोहीम राबवली जात आहे.


शनिवारी सुमारे 56 लाख लोकांना लसीकरण करण्यात आले


शनिवारपर्यंत देशभरात कोरोना लसीचे 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 डोस लागू केले गेले आहेत. तर शनिवारी 55 लाख 91 हजार 657 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.


कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट पाहता केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकार जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्यावर भर देत आहेत.


सध्या कोरोनाव्हायरसच्या तीन लसी भारतात दिल्या जात आहेत. यामध्ये भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड या दोन भारतीय लसींचा समावेश आहे. याशिवाय, रशियन लस स्पुतनिक व्ही देखील देशात दिली जात आहे. भारत सरकारने अलीकडेच सिंगल-डोस जॉन्सन अँड जॉन्सन लसला देखील मंजूरी दिली आहे.


कोरोनाची लस आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर, ती अँटीबॉडीज तयार करते, जी कोरोनाशी लढण्यास आपल्या पेशींना सक्षम करते. ही लस आपल्याल गंभीर किंवा सिरियस आजार आणि मृत्यूसारख्या अप्रिय घटनांपासून आपले संरक्षण करते.


परंतु लोकांच्या मनात हा एक मोठा प्रश्न आहे की शेवटी, आपल्या शरीरात लसीद्वारे तयार केलेल्या प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीज किती काळ प्रभावी राहतात? यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टर संदीप मिश्रा यांनी उत्तर दिले आहे.


मिश्रा म्हणाले, “लसीचा पूर्ण रिस्पोंस हा सुमारे 9 महिन्यांपर्यंत असतो. यामध्ये अँटीबॉडीज हे 6 महिन्यांसाठी पूर्णपणे प्रभावी असतात, त्यानंतर त्याचा प्रभाव कमी असू शकतो. सध्या लसीचे दोन डोस सर्व लोकांना दिले जात आहेत आणि कदाचित एक वर्षानंतर बूस्टर डोस देखील दिला जाऊ शकतो. या विषयावर अनेक ठिकाणी संशोधन सध्या सुरु आहे.