मुंबई : अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती डोकं वर करत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, देशात जोपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कोरोनाचा धोका कायम आहे. 


महामारी अद्याप संपलेली नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, WHO ने प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेयियस यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामारी वाढत आहे. 


कितीही महामारीला लांब करण्याचा प्रयत्न केला तरीही ती संपत नाही. जोपर्यंत संपूर्ण देशातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होत नाही. तोपर्यंत या कोरोना संक्रमणाचा धोका कमी होणार नाही. 


नव्या कोरोनाबाधित प्रकरणात ७ टक्क्याने वाढ 


या अगोदर WHOने सांगितलं की, वाढत्या रूग्णांचा धोका पाहता रूग्णांमध्ये ७ टक्क्याने वाढ झाली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रूग्णांची संख्या मात्र भरपूर कमी झाली आहे. 


घेब्रेयियस यांनी म्हटलं आहे की, कोविड-१९ चा धोका जगभरात वाढला आहे. यामुळे आशियात कोरोनाचा प्रकोप आणि यूरोपमध्ये नवीन लाट आली आहे. 


अनेक देशात महामारीचा धोका देखील वाढला आहे. कोरोनाबाधितांच्या मृताचा आकडा हा ओमायक्रॉनच्या पसरण्यामुळे वाढला आहे. यासोबतच अद्याप लोकांच लसीकरण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. 


७० टक्के लोकांचं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अद्याप झालेलं नाही 


देशातील ७० टक्के लोकांचं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झालेलं नाही. आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ मंडळी आणि इतर आजार असलेल्या रूग्णांना लसीकरणासाठी प्राथमिकता देण्यात आली आहे. 


काही उच्च उत्पन्न असलेल्या देशांनी दुसरा बूस्टर डोस प्रस्तावित केला आहे. परंतु जगातील 1/3 लोकसंख्येला अद्याप लसीकरण केलेले नाही. अनेक देशांमध्ये लसीकरणाबाबत प्रगती झाली आहे.


नायजेरियामध्ये पुरवठा स्थिर असूनही, लसीकरण वाढले आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 12 दशलक्षाहून अधिक नवीन साप्ताहिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि मृत्यू दर 23 टक्क्यांनी घसरला आहे.