नवी दिल्ली : गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत इतर नेते देखील मंत्रीपदाची शपथ घेतील. मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल याबाबत उत्सूकता कायम आहे. काही नावे अशी ही आहेत. ज्यांना मंत्रीपद मिळणं निश्चित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह


सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष अमित शाह हे या यादीत पहिल्या स्थानी आहेत. अमित शाह पहिल्यांदा लोकसभेत आले आहेत. अमित शहा यांना गृह किंवा संरक्षण खातं मिळू शकतं. अमित शहा मंत्री झाल्यानंतर पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या नेत्याला केलं जाणार आहे.


राजनाथ सिंह


गृहमंत्री राजनाथ सिंह यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. जर अमित शहा यांना गृह मंत्रालय दिलं तर राजनाथ सिंह यांना संरक्षण खातं दिलं जावू शकतं.


नितीन गडकरी


पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात यशस्वी आणि लोकांनी देखील ज्यांच्या कामाचं कौतुक केलं अशा नितीन गडकरी यांना त्यांचं आहे तेच खातं पुन्हा दिलं जावू शकतं. गडकरी हे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री आहेत.


रविशंकर प्रसाद


पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये रविशंकर प्रसाद यांना बढती मिळू शकते. रविशंकर प्रसाद हे सध्या कायदा मंत्री आहेत.


पीयूष गोयल


अरुण जेटली यांची प्रकृती ठिक नसल्याने मोदींच्या मंत्रिमंडळात ते आता नसणार आहेत. त्यांच्या जागी अर्थ खातं हे पीयूष गोयल यांच्याकडे दिलं जावू शकतं.


स्मृती इराणी


स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना यंदा चांगलं खातं मिळू शकतं. इराणी यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं.


निर्मला सीतारमण


संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांना देखील मंत्रीपद मिळणार हे नक्की आहे. त्यांचं नाव लोकसभा अध्यक्ष पदासाठी देखील चर्चेत असल्याचं बोललं जातं आहे.


प्रकाश जावडेकर 


प्रकाश जावडेकर यांना देखील मंत्रीपद मिळू शकतं. त्यांचं मानव संसाधन विकास मंत्रालय त्यांना कायम ठेवलं जावू शकतं.


इतर नावं


जनरल व्ही.के सिंह, नरेंद्र सिंह तोमर, थावर चंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी, जीतेंद्र सिंह, सुखबीर सिंग बादल, लल्लन सिंह आणि राम विलास पासवान यांना देखील मंत्रीपद निश्चित मानलं जातं आहे.