मुंबई : मुलींना डेटी खूप आवडतो. व्हॅलेंटाइन डे वीकमध्ये आवर्जून टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी गर्लफ्रेंडला टेडी दिला जातो. काही मित्र-मैत्रिणी किंवा मैत्रिणी मैत्रिणी देखील टेडी डे साजरा करतात. एकमेकांना टेडी देतात. यंदाच्या व्हॅलेंटाइन डेला तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा मैत्रिणीला टेडी देण्याआधी ही एक गोष्ट माहीत आहे का नक्की विचारा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेडी डे नेमका का साजरा केला जातो? ही संकल्पना आली कशी? टेडी बियर तयार करावा असं पहिल्यांदी कोणाला आणि का वाटलं? त्याचा इतिहास फार रंजक आहे. भारतात टेडी डे 10 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. मात्र त्याआधी टेडी बियरचा रंजक इतिहास जाणून घेऊया. 


काय आहे टेडी बियरचा इतिहास? 
14 नोव्हेंबर 1902 मध्ये अमेरिकेमध्ये तत्कालीन अध्यक्ष थियोडोर रूजवेल्ट मिसिसिपी एक जंगलात शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहाय्यकाला एक जखमी अवस्थेतील अस्वल दिसलं. त्याने हे अस्वल पकडलं आणि झाडाला बांधून ठेवलं. त्याला पाहून थियोडोर रूजवेल्ट मिसिसिपी यांना शिकार करण्याची इच्छा झाली नाही. या अस्वलावर दया आली. 


अस्वलाला न मारता त्यांनी जीवदान दिलं. 16 नोव्हेंबर रोजी 'द वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राने या घटनेवर आधारित चित्र छापले होते. जे व्यंगचित्रकार क्लिफर्ड बेरीमन यांनी तयार केलं होतं. याची बातमी सर्वदूर पसरली. 


टेडी नावाची उत्पत्ती कशी झाली?
वृत्तपत्रात आलेला फोटो पाहून एक व्यवसायिक यावर विचार करू लागला. त्याला हा फोटो पाहून लहान मुलांसाठी अशा आकाराचा अस्वल आपण का तयार करू शकत नाही? असा प्रश्न पडला आणि त्याने आपल्या पत्नीसोबत खेळण्याचं डिझाइन तयार केलं. 


त्याकाळी अध्यक्ष रुजवेल्ट यांचं टोपणनाव टेडी होतं. त्यामुळे हे खेळणं त्यांना समर्पित करण्यात आलं. अस्वलाला इंग्रजीत बियर म्हणतात म्हणून टेडी बियर हा शब्द प्रचलित झाला. आज वेगवेगळ्या रंगातील, फरमधील कापडातील टेडी बियर आपण सहज खरेदी करतो. मॉरिस मिचटॉम ही आयडिया प्रत्यक्षात उतरवणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं. 


का साजरा केला जातो? 
व्हॅलेंटाइन डेमध्ये तो साजरा करण्याचं कारण म्हणजे मुली आहेत. त्यांना हा अत्यंत मऊ असल्याने खूप आवडतो. लहान मुलंच नाही तर वयात आलेल्या मुली, तरुणी टेडी बियरच्या प्रेमात असतात. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो. त्यामुळे व्हॅलेंटाइन वीकमध्ये हा दिवस 10 फेब्रुवारीला साजरा करण्याची परंपरा आहे.