भोपाळ: आजपर्यंत राजकीय लढाईत मी कोणाच्याही कुटुंबीयांना लक्ष्य केले नाही. मी केवळ त्यांच्या राजकीय पदावर टीका केली. परंतु काँग्रेसचे नेते माझ्या आई-वडिलांवर वैयक्तिक टीका का करत आहेत, असा उद्विग्न सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. ते रविवारी विदिशा येथील जाहीर सभेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी शनिवारी पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. राहुल गांधी यांच्या मागील चार-पाच पिढ्यांबाबत सर्वांनाच माहिती आहे. पण, ज्या पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत कुणालाच काही माहिती नाही, ते राहुल गांधींकडे हिशेब मागत आहे, असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले होते. 



या पार्श्वभूमीवर बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, माझ्या वडिलांना जाऊन ३० वर्षे झाली. मग त्यांना अकारण या वादात का ओढले जातेय? माझ्या घराण्यातील कोणाचाही राजकारणाशी संबंध नव्हता. यावर काँग्रेसचे नामदार बोलतात की, मोदीही माझ्या परिवारावर टीका करतात. मात्र, मी त्यांच्या कुटुंबीयांविषयी नव्हे तर देशाच्या माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्यांविषयी बोलतो, असे मोदींनी सांगितले.