मुंबई : रस्त्यानं जात असताना अशी एक तरी इमारत आपल्या नजरेस पडते ज्यावर हिरव्या रंगाचे लांबलचक कपडे टाकलेले असतात. त्या इमारतीचं बांधकाम किंवा डागडुजी सुरु असल्याचंही आपल्याला दिसतं. आता मुद्दा असा की अशा कित्येक इमारती आपण जिथे जाऊ तिथे नजरेत येतात. (Construction building)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी विचार केलाय का या इमारती हिरव्या कपड्यानेच का झाकल्या जातात? का याच रंगाची निवड केली जाते? यामागे काही कारण आहे का? तर होय... यामागे एक नाही अनेक कारणं आहेत... चला जाणून घेऊया हिच काही कारणं... 


संरक्षण- बांधकाम सुरु असताना तिथून धुळ, माती, खडी किंवा इतर सामग्री बाहेरच्या बाजुला न पसरावी यासाठी हे कापड टाकलं जातं. कोणताही धोका न येणं हा त्यामागचा हेतू असतो. 


कचऱ्याचं प्रमाण कमी- या कापडामुळं बांधकामातील कचरा कमी करण्यात मोठी मदत होते. जेव्हा बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु असतं आणि धुळ उडते तेव्हा हे कापड पाण्याने ओलं करण्यात येतं. 


कापड ओलं असल्यामुळे धुळ माती त्यावर चिकटते आणि आजुहाजूच्या भागात धुळ पसरत नाही. 


सूर्यकिरणांपासून बचाव- कापडाचा हिरवा रंग बांधकामाधीन वास्तू किंवा इमारतीला सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवतात. परिणामी त्यात अधिक पाणी शोषलं जातं. बांधकाम पक्कं करण्यासाठी ही बाब अतिशय फायद्याची ठरते. 


सर्वांना सतर्कतेचा इशारा- बांधकाम सुरु असणाऱ्या इमारत किंवा ठिकाणहून येणारे आणि जाणारे या कापडाच्या रंगामुळे अधिक सतर्क होतात. काही अंतर दुरुनही जातात. ही सतर्कता बरीच महत्त्वाची असते. 


गोपनीयता- अनेकदा काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये इमारत पूर्ण होऊन ती तयार होईपर्यंत हे हिरवं कापड वापरण्यात येतं. मुळात यामागे गोपनीयता पाळत आपल्या कामातून सर्वांना थक्क करणं हासुद्धा एक हेतू असतो. 


आता तुम्ही म्हणाल हिरवाच रंग का? तर पांढरा आणि काळा या दोन्ही रंगांच्या तुलनेच हिरवा रंग हा बऱ्याच अंतरावरून आपल्या नजरेत येतो. शिवाय सूर्यकिरणं परतवून लावण्यासाठीही तो मदत करतो. 


आहे की नाही ही गंमत? म्हणजे इमारतीच्या बांधकामामध्ये हा हिरवा कपडाही तितकाच महत्त्वाचा, नाही का?