मुंबई : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Patients) वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाही सतर्क झालं आहे. देशात कोरोनाचा प्रकार Omicron चे उप व्हेरिएंट BA.2, BA.2.38 असल्याचे आढळून आले आहे. एवढेच नाही तर ओमायक्रॉन आणखी उप-प्रकार BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे देखील काही भागात आढळून आली आहेत. या उप-प्रकारांमुळे, कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी मात्र ही दिलासादायक बाब आहे की, आतापर्यंत कोरोनाचे कोणतेही नवीन रूप सापडलेले नाही.


जीनोमिक चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचे ba.2 सबवेरियंट 60 टक्के आढळले आहे तर रुग्णांच्या नमुन्यांमध्ये ba.2.38 33 टक्के आढळले आहे. BA.4 आणि BA.5 ची टक्केवारी अजूनही खूपच कमी आहे ही दिलासादायक बाब आहे. मुंबई, त्रिवेंद्रम, पुद्दुचेरी, मिझोराम, ईशान्य, दिल्ली-एनसीआर आणि केरळमध्ये ओमायक्रॉनचे उप-प्रकारांचे क्लस्टर्स नोंदवले गेले आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणे BA.2 आणि BA.2.38 चे आहेत.


न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, ओमायक्रॉनचे BA.2 आणि BA.2.38 समान प्रमाणात आढळले आहेत. एवढेच नाही तर, सध्या हे सबवेरिएंट्स उच्च प्रसारण कार्यक्षमतेसह बहुतेक ठिकाणी वर्चस्व गाजवण्याचे संकेत देत आहेत. ही देखील दिलासा देणारी बाब आहे की बहुतेक प्रकरणे सौम्य संसर्गाची आहेत. ज्यात सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.


देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये, INSACOG टीम सदस्यांनी परिस्थितीवर चर्चा केली आणि लोकांना COVID-19 प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, देशात, विशेषत: ज्या भागात ओमायक्रॉनचे क्लस्टर आढळले आहेत तेथे ट्रेसिंग चालू ठेवावे. ही माहिती अशा वेळी आली आहे जेव्हा शनिवारी देशात 13,216 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. भारतात 113 दिवसांत 13,000 हून अधिक रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.