सीलिंग फॅनला आपल्याकडे 3, तर परदेशात 4 पाती का असतात? जाणून घ्या यामागचं कारण
पंख्याचं निरीक्षण केल्यानंतर एक लक्षात येईल की, पंख्याला तीनच पाती असतात. दुसरीकडे, परदेशातील पंख्याला चार पाती असतात.
Knowledge News: थंडी असो की, कडक उन्हाळा आपल्याला पंख्याची हवा हवीहवीशी वाटते. उन्हाळ्यात तर पंख्याची सर्वात जास्त आवश्यकता भासते. पंखा आपल्या सर्वांच्या घरी असतो. पण पंख्याचं निरीक्षण केल्यानंतर एक लक्षात येईल की, पंख्याला तीनच पाती असतात. दुसरीकडे, परदेशातील पंख्याला चार पाती असतात. तर टेबल फॅनला चार पाती असतात. असं असण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. चला तर जाणून घेऊयात.
जास्त पाती असल्यास वेग कमी होतो
पंख्यामध्ये जितकी जास्त पाती असतील तितकी हवा कमी होते, असं विज्ञान सांगतं. भारताची भौगोलिक स्थिती पाहता सर्वाधिक उष्णता जाणवते. अशा परिस्थितीत हवेसाठी पंख्याचा वापर येथे केला जातो. त्यामुळे इथल्या पंख्यांना फक्त तीन पाती असतात. कारण इथे जास्त हवा आवश्यक असते. दुसरीकडे हाय स्पीड फॅन्सला फक्त दोन पाती असतात.
परदेशात व्हेंटिलेशनसाठी वापर
परदेशात पंख्याला चार ब्लेड असतात. वास्तविक, तिथले तापमान कमी असते आणि पंख्याचा वापर एसीला पर्याय म्हणून केला जातो किंवा पंखा व्हेंटिलेटर म्हणून वापरला जातो. तिथे पंख्यामधून हवा कमी लागते. यामुळेच चार पाती असतात.
AADHAAR CARD अशा ठिकाणी डाउनलोड केलं असेल तर लगेच डिलीट करा, अन्यथा...
विज्ञान काय म्हणते?
विज्ञानानुसार पंख्याला चार ब्लेड असतील तर मोटारवर जास्त दाब येतो आणि कमी हवा फेकते. दुसरीकडे पात्यांची संख्या कमी असल्यास मोटरवर कमी परिणाम होतो आणि जास्त हवा फेकते. जास्त पाती असलेला पंखा घाम सुकवण्यासाठी कामी येतो. तर कमी पात्यांचा पंखा व्हेंटिलेटरसाठी वापरला जातो. घरातील हवा बाहेर काढण्यासाठी याचा अधिक वापर केला जातो.