एखादं गाणं ऐकल्यानंतर आपण दिवसभर ते का गुणगुणतो?
यामागील कारण जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन सुरु केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली.
मुंबई : बऱ्याच लोकांसोबत असं अनेकदा घडतं की, जेव्हा ते एखादं गाणं ऐकतात, तेव्हा ते गाणं त्यांच्या डोक्यात असं काही बसतं की, आपण ते संपूर्ण दिवसभर गात असतो. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या तोंडात ते गाणं राहातं. मधेच आपण कितीही गाणी ऐकली तरी जे गाणं आपल्या तोंडातून किंवा डोक्यातून जात नाही. परंतु असं का होतं? याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
यामागील कारण जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे आपल्या जिभेमुळे होतं की, कानामुळे हे शोधण्याचा प्रयत्न केला. यानंतर असे आढळून आले की मेंदूच्या विशेष कार्यामुळे असे घडते.
विज्ञानात एक शब्द आहे इयरवॉर्म्स (Earworms). ही आपल्या मेंदूमध्ये काम करणारी एक संवेदना आहे. ज्यामुळे असं घडतं.
अमेरिकन सायकोलॉजी असोसिएशनच्या जर्नलने यासंदर्भात एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. या संशोधनानुसार, एखादी वेगळी धून किंवा म्यूजिक लक्षात ठेवणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे. आपला मेंदू अशी गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो.
डार्टमाउथ विद्यापीठाच्या संशोधकांनी एक गाणं रिसर्चचा भाग असलेल्या लोकांना एकवलं. त्यानंतर संशोधनात असं आढळून आलं की, या लोकांचा 'ऑर्डेटरी कॉर्टेक्स' हा भाग सक्रिय झाला.
हे 99% लोकांसोबत घडलं
ज्या लोकांनी हे गाणं गायलं होतं. हे गाणे तो सतत गाऊ लागले. हे इयरवॉर्म्समुळे होतं. एखादी ट्यून मधुर असेल तर ती मेंदूमध्येच राहाते आणि मेंदू त्याची सतत आठवण करुन देत असतो.
एकप्रकारे, श्रवणविषयक कॉर्टेक्स हा मानवी मेंदूचा असा भाग आहे, जो एकदा काही ऐकल्यानंतर वेगळी प्रतिक्रिया देतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 99 टक्के लोकांसोबत असंच घडलं आहे. म्हणजेच बहुतांश लोकांसोबत असा प्रकार नेहमी घडतो.