Why People Say Touchwood: तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की, लोकं बोलता बोलता 'टचवूड' असं पटकन म्हणून जातात. कदाचित टचवूड म्हणण्याची तुम्हालाही सवय असेल. एखाद्या लाकडाला हात लावून 'टचवूड' असं बोललं जातं. पण तुम्हाला माहिती का? हा शब्द नेमका कुठून आला आणि त्यामागे नेमकं कारण काय आहे? आपल्याकडे मूर्तीपूजक असा एक समाज आहे. वड, पिंपळ हे वृक्ष तर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. सौभाग्यासाठी वटवृक्षाभोवती स्त्रिया फेऱ्या मारतात. तर 27 नक्षत्रानुसार प्रत्येक नक्षत्राचं एक झाड आहे. त्यामुळे वृक्ष पूजन आपल्याकडे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, लाकडामध्ये देव, परी, पवित्र आत्मा यांचा वावर असतो, अशी समज आहे. त्यामुळे लाकडावर दोनदा हात लावण्याची परंपरा आहे. पहिल्या टचमध्ये झाडाला इच्छा सांगणे आणि दुसऱ्या वेळी टच करून आभार माननं असा होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाकडाला स्पर्श केल्याने नशिबाची साथ मिळते, असा विश्वास आहे. मात्र, हा विश्वास इतका दृढ का व कसा झाला, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. दुसरीकडे लाकडाला स्पर्श करून दृष्ट आत्म्यांचं लक्ष विचलीत करण्याचा असतो, असंही बोललं जातं. कारण दृष्ट आत्मा ते पूर्ण होण्यापासून रोखू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टचवूड जगात रूढ झालेली कल्पना आहे.


बातमी वाचा- Fixed deposits vs Liquid Funds: तुमचा फायदा कुठे आहे, फरक समजून घ्या आणि योग्य पर्याय निवडा


'टचवूड' अनेक देशात बोललं जातं


टचवूड असं जगातील बहुतांश देशांमध्ये बोललं जातं. ब्राझीलमधील Bater Na Madeira हा वाक्यप्रचार ब्राझीलमध्ये प्रचलीत आहे. इंडोनेशियामध्ये Amit-Amit, इराणमध्ये Bezanam Be Tachte असं बोललं जातं. ग्रीसमध्येही टचवूड बाबत अशीच म्हण प्रचलीत आहे. नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी टचवूड असं संबोधलं जातं, असंच म्हणावं लागेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)