Fixed deposits vs Liquid Funds: तुमचा फायदा कुठे आहे, फरक समजून घ्या आणि योग्य पर्याय निवडा

Low Risk Investment: प्रत्येक व्यक्ती उत्पन्नासोबत गुंतवणुकीचा विचार करत असतो. कमी जोखम असलेल्या गुंतवणुकीला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. जर तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर फिक्स्ड डिपॉझिट हा इक्विटीपेक्षा चांगला पर्याय आहे. पण जोखीम घेऊन चांगला रिटर्न्स मिळावयचा असेल, तर लिक्विड फंडाचा विचार करू शकता.

Updated: Nov 27, 2022, 02:42 PM IST
Fixed deposits vs Liquid Funds: तुमचा फायदा कुठे आहे, फरक समजून घ्या आणि योग्य पर्याय निवडा title=

Low Risk Investment: प्रत्येक व्यक्ती उत्पन्नासोबत गुंतवणुकीचा विचार करत असतो. कमी जोखम असलेल्या गुंतवणुकीला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. जर तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर फिक्स्ड डिपॉझिट हा इक्विटीपेक्षा चांगला पर्याय आहे. पण जोखीम घेऊन चांगला रिटर्न्स मिळावयचा असेल, तर लिक्विड फंडाचा विचार करू शकता. लिक्विड फंड ही एक प्रकारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आहे. यात फिक्स्ड डिपॉझिटसारखी कमी जोखीम असते. यामध्ये तुमचे पैसे कमर्शियल पेपर, सरकारी सिक्युरिटीज, बॉण्ड्स किंवा ट्रेझरी बिल्स यांसारख्या निश्चित उत्पन्न सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. अल्प मुदतीच्या नफ्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. पण गुंतवणूक करताना तुम्ही संभ्रमात असालल तर फिक्स्ड डिपॉझिट आणि लिक्विड फंडमधील फरक जाणून घ्या. जेणेकरून तुम्‍हाला या कमी जोखमीच्‍या गुंतवणुकीबाबत माहिती मिळेल आणि चांगला निर्णय घेता येईल.

फिक्स्ड डिपॉझिट आणि लिक्विड फंड

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये निश्चित कालावधीसाठी निश्चित व्याज दराने व्याज मिळते. बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था तुम्हाला या योजना देतात. बँकेत पैसे ठेवण्याऐवजी त्याची एफडी केल्याने बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज मिळतं. दुसरीकडे तुम्ही लिक्विड फंडाचा पर्यायही निवडू शकता. अल्पकालीन नफ्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा एक म्युच्युअल फंड असून निश्चित उत्पन्न रोख्यांमध्ये गुंतवणूक करतो. यामुळे भांडवल संरक्षण आणि लिक्विडिटी देते. तुम्हाला बचत खात्यापेक्षा चांगले व्याज मिळते. या दोघांमधील फरक समजून घेऊ या.

बातमी वाचा- Amazon नं ही सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय, 29 डिसेंबरनंतर सर्व्हिस मिळणार नाही

मुदत ठेवी आणि लिक्विड फंड यांच्यातील तुलना

फीचर्स फिक्स्ड डिपॉझिट लिक्विड फंड
रिस्क ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामध्ये कमीत कमी धोका असतो. सामान्यतः, तुम्हाला एफडीची रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज यावर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देखील मिळते. लिक्विड म्युच्युअल फंड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवतात, परंतु शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेतील चढ-उतारांचा परिणाम होतो, त्यामुळे मुदत ठेवींच्या तुलनेत थोडासा धोका आहे.
रिटर्न तुम्हाला एफडीवर मिळणारे व्याज RBI ने ठरवलेल्या पॉलिसी रेटमुळे प्रभावित होते. यावर निश्चित परतावा बचत खात्यापेक्षा जास्त असू शकतो. परंतु लिक्विड फंडापेक्षा कमी असतो. लिक्विड म्युच्युअल फंड हमी परतावा देत नाहीत. पण त्यांचा परतावा एफडीपेक्षा चांगला आहे. तुमचा फंड मॅनेजर फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये जास्त जोखीम तर घेत नाही ना हे पाहणं गरजेचं आहे.
लिक्विडिटी एफडीमध्ये तुम्हाला मॅच्युरिटी तारखेपर्यंत पैसे ठेवावे लागतात. व्याज दर मूळ रक्कम आणि कार्यकाळानुसार मिळते. यामध्ये तुम्ही मुदतपूर्व पैसे काढू शकता, परंतु यासाठी तुम्हाला दंड भरावा लागतो. लिक्विडिटी फंड्समध्ये, तुम्ही कोणत्याही एक्झिट लोडशिवाय कधीही तुमच्या युनिट्स रीडिम करू शकता, परंतु सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही युनिट्स घेतल्यापासून 7 दिवसांच्या आत युनिट्स रिडीम केल्यास, तुम्हाला एक्झिट लोन भरावे लागेल. म्हणजेच, लिक्विड फंड एफडीपेक्षा जास्त लिक्विडिटी प्रदान करते, तर त्याच्यावर दंड आकारणी देखील कमी असते.
मॅच्योरिटी मुदत ठेवी एका निश्चित कालावधीसाठी ठेवाव्या लागतात, त्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या वेगवेगळ्या कालावधीत असू शकतात. लिक्विड फंड 91 दिवसांपर्यंतच्या मॅच्युरिटीसह येतात.
टॅक्सेशन FD मधून मिळणारे व्याज तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाते आणि नंतर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर कापला जातो. तसेच, जेव्हाही तुम्हाला व्याज मिळते तेव्हा बँक त्यावर 10% TDS कापते. वर्षाच्या शेवटी, तुम्हाला TDS रक्कम वजा केल्यावर होणारा कर भरावा लागेल. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह कर बचतीची एफडी देखील मिळवू शकता. यासह, तुम्हाला 1.5 लाखांपर्यंत कर सूट मिळेल. तुम्ही तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लिक्विड फंड धारण केल्यास, मिळालेले व्याज दीर्घकालीन भांडवली नफा म्हणून मानले जाईल आणि 20% इंडेक्सेशन नंतर त्यावर कर आकारला जाईल. त्याच वेळी, तुमच्या कर स्लॅबनुसार तीन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी होल्डिंगवर मिळणाऱ्या व्याजावर कर कापला जाईल.