Banana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण
Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.
Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते. त्यामुळे डॉक्टर केळं खाण्याचा सल्ला देतात. दुसरीकडे केळ्याचं पौराणिक महत्त्व देखील आहे. पूजाविधीत केळ्याला महत्त्वाचं स्थान आहे. केळ्याची उत्पत्ती 4000 वर्षांपूर्वी मलेशियात झाल्याचं सांगितलं जातं. मात्र केळं पाहिल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की, केळं वाकडं का असतं? केळं कधीच सरळ नसतं कारण यामागे एक खास कारण आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या यामागचं खास कारण....
केळ्याचे घड झाडाला लागतात. पहिल्यांदा फूल आलं की ते गळून केळी येण्यास सुरुवात होते. केळी एका मागोमाग एक वाढत जात आणि त्याचा आकार वाढण्यास सुरुवात होते. तसेच जमिनीच्या दिशेने घड वाढत जातो. पण सूर्यप्रकाश वरून येत असल्याने केळी वरच्या दिशेने वळण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला निगेटिव्ह जियोट्रोपिज्म (झाडाचं सूर्याकडे आकर्षित होणं) असं संबोधलं जातं. यामुळे केळी सरळ वाढण्याऐवजी वाकडी होतात. केळ्यासारख सूर्यफुलाचं देखील आहे. निगेटीव्ह जियोट्रोपिज्ममुळे सूर्यप्रकाशाकडे खेचलं जातं. सूर्य ज्या बाजूने असतो, त्या बाजून हे फुल फिरत राहतं.
बातमी वाचा- VIDEO : बटाटा-कोबीसारखे पोत्यात भरुन आणले 300 साप अन् मग...
केळी तपकिरी का होतात?
तुम्हाला माहिती आहे का, की जगभरात 50 दशलक्ष टन केळी तपकिरी रंगाचे ठसे असल्यामुळे फेकल्या जातात. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी (science revealed secret) नुकत्याच केलेल्या संशोधनात केळीवरील या काळा आणि तपकिरी रंगाबद्दल गुपित उघड केलं आहे. शास्त्राज्ञनुसार केळीच्या सालीमध्ये इथिलीन गॅस असतो. त्यात असलेले क्लोरोफिल ते मोडून टाकते. केळीच्या हिरवटपणासाठी क्लोरोफिल जबाबदार आहे. केळीच्या सालीमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण वाढतं आणि ते वातावरणातील ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देत असल्याने त्याचा हिरवापणा कमी होतो. यासोबतच यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. त्यामुळे केळीचा गोडवा वाढतो.
केळी कधी पिकू लागतात?
जेव्हा केळीमधून फक्त गॅस निघतो आणि त्यामुळेच केळी पिकू लागतात. त्यामुळे त्यात गोडवा वाढतो आणि काही दिवसांनी ते अधिक पिकते. केळीसोबत ठेवलेल्या बहुतांश फळांवर इथिलीन वायूचा परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ, सफरचंद केळीसोबत ठेवल्यानंतर काही तासांनंतर ते पिकलेले दिसतात आणि ते मऊ होऊ लागतात. त्याच वेळी, संत्री, लिंबू आणि बेरी ही अशी फळे आहेत ज्यांना इथेन गॅसचा प्रभाव पडत नाही. तसंच तुम्ही जर केळीच्या आजूबाजूला दुसरं फळ ठेवलेत, तर ते केळीमुळे पिकू लागतात. त्यामुळे शक्यतो इतर फळांसोबत केळी ठेऊ नका.