IPO मधील शेअर्स सर्वांना का मिळत नाहीत? SEBI च्या चेअरपर्सनने सांगितलं खरं कारण
Madhabi Puri Buch On IPO : इनिशियल पब्लिक ऑफर्समध्ये प्रो-रेटा आधारावर शेअरचे वाटप थांबवण्यात आलं, कारण त्यामुळे प्राइस-डिस्कवरी सिस्टम भ्रष्ट होत होती, असं सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सांगितलं आहे. बुच यांनी शुक्रवारी सीआयआय ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरमला संबोधित करताना महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
Why everyone doesn't get shares in IPO : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना सीआयआय ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरममध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी अनेकांच्या प्रश्नांवर उत्तरं दिली. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या इंडिया प्रॅक्टिसचे चेअरमन जनमेजय सिन्हा यांनी एक मुद्दा उपस्थित केला. किरकोळ गुंतवणूकदार आणि उच्च नेट वर्थ व्यक्तींना होणाऱ्या रॅडम आयपीओबद्दल प्रश्न विचारला. पुर्वीची शेअर्सच्या वाटपाची प्रो-रेटा पद्धत का बंद केली? असा सवाल त्यांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.
काय म्हणाल्या Madhabi Puri Buch ?
इनिशियल पब्लिक ऑफर्समध्ये प्रो-रेटा आधारावर शेअरचे वाटप थांबवण्यात आलं, कारण त्यामुळे प्राइस-डिस्कवरी सिस्टम भ्रष्ट होत होती, असं सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सांगितलं आहे. प्रो-राटा सिस्टममध्ये IPO वाटप प्रमाणानुसार केलं जातं. याचा अर्थ असा की, अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला वाटा मिळतो. परंतु त्यांनी ज्या प्रमाणात अर्ज केला आहे त्याच प्रमाणात हे वाटप त्यांना दिलं गेलं पाहिजं असं नाही. ओव्हरसबस्क्रिप्शन झाल्यास, प्रत्येकाला त्यांनी अर्ज केलेल्या संख्येच्या प्रमाणात वाटप केलं जातं.
प्रो-राटा सिस्टममध्ये आयपीओचं चुकीचं चित्र मांडलं जातंय. आयपीओच्या मागणीला अतिशयोक्ती दिली जातीये. गुंतवणूक बँकर्स त्यांच्या ग्राहकांना आवश्यकतेपेक्षा जास्त शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शेअर्सच्या संख्येऐवजी अर्जांच्या गुणोत्तरावर आधारित वाटप केले जाईल. त्यामुळे ओव्हरसबस्क्रिप्शन होण्याची शक्यता जास्त असते आणि गुंतवणूकदारांना समान अधिकार मिळत नाहीत, असं माधबी पुरी बुच यांनी म्हटलंय. बाजार नियामक कधीही IPO च्या प्राइस डिस्कवरीवर निर्णय घेणार नाही आणि त्याऐवजी बाजाराला मागणी आणि पुरवठा यावर आधारित किंमत ठरवू देईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, IPO च्या माध्यमातून तुम्हालाही नफा मिळवायचा असेल, तर एक चांगली संधी आली आहे. 11 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात 7 IPO येणार आहेत. यात पैसे गुंतवणूक तुम्ही चांगली कमाई करू शकता.