...म्हणून मुख्यमंत्रीपद शेअर नाही करत कुमारस्वामी
पाहा काय आहे या मागचं खरं कारण...
बंगळुरु : जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी आता मागच्या चुका पुन्हा नाही करु इच्छित. काही चुकांमुळे त्यांना याआधी सत्ता सोडावी लागली होती. काँग्रेस आणि जेडीएसमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतंही रोटेशन नसणार आहे. 2007 मध्ये भाजपसोबत सत्तेत असताना रोटेशनमुळे सरकार पडलं होतं.
काँग्रेस आणि जेडीएस नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपद जेडीएसला तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं आहे. कुमारस्वामी हे 23 मेला कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी त्यांना अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि मोठ्या नेत्यांना आमंत्रित करायचं आहे.
मुख्यमंत्रीपद नाही शेअर करत कुमारस्वामी
2007 मध्ये भाजप आणि जेडीएस यांच्यात युती झाल्याने कर्नाटकमध्ये दोघांनी सरकार स्थापन केलं. दोन्ही पक्षाने ठरवलं होतं की, मुख्यमंत्री रोटेशनल राहिल. आधी जेडीएसचा मुख्यमंत्री मग भाजपचा मुख्यमंत्री. कुमारस्वामी आधी मुख्यमंत्री बनले. त्यानंतर भाजपने आरोप लावला की त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनण्य़ाची वेळ आली तेव्हा कुमारस्वामी यांनी ते मान्य केलं नाही. यामुळे सरकार पडलं. त्यामुळे कुमारस्वामी आता हा फॉर्म्यूला मान्य नाही करत.
सोनिया आणि राहुल गांधींची घेणार भेट
विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर काँग्रेसने आपली पराभव मान्य करत जेडीएसला कोणतीही अट न ठेवता पाठिंबा जाहीर केला. पण भाजप बहुमत सिद्ध करु न शकल्याने आता काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षाच्या गोष्टी बोलत आहेत. सरकारमध्ये मंत्रीपदाबाबत चर्चेसाठी कुमारस्वामी दिल्लीला जाणार आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करुन ते पुढील निर्णय घेणार आहेत.
2004 मध्ये कुमारस्वामींना फटका
जेडीएस आणि काँग्रेसने 2004 मध्ये सरकार स्थापन केलं. पण ते फक्त 2 वर्ष टिकलं. त्यावेळी सिद्धारमैया जेडीएसमध्ये होते. काँग्रेसने दोन वर्षानंतर सिद्धारमैया यांना पाठिंबा दिला. सिद्दरमैया काँग्रेसमध्ये आले आणि 2013 मध्ये मुख्यमंत्री झाले. 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला.