नारायण राणे मंत्रीपदासाठी पुन्हा दिल्ली दरबारी?
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नेते नारायण राणे हे सध्या नवी दिल्लीत आहेत. दिल्लीत भाजपची मुख्यमंरी परिषद सुरू आहे.
नवी दिल्ली : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नेते नारायण राणे हे सध्या नवी दिल्लीत आहेत. दिल्लीत भाजपची मुख्यमंरी परिषद सुरू आहे.
नारायण राणे यांना मंत्रीपदाचे आश्वासन देऊन आता अनेक महिने लोटले आहेत. तरीही अजून त्यांनी मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे नारायण राणे आता पुन्हा एकदा दिल्ली दरबारी गेले असल्याची चर्चा होत आहे.
भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत आहेत. या परिषदेला अमिता शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही हजेरी असणार आहे. तर नारायण राणे हे अमित शाह यांची भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे.