नवी दिल्ली : भीमा कोरेगाव प्रकरणी अजून मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार खडसावलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच, अंतरिम जामिनाची मुदत वाढवून सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना दिलासाही दिलाय. त्यामुळे, एकबोटेंना १४ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालंय. 


१४ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, पण त्यांना अजून अटक झालेली नाही. 


आजच्या सुनावणी संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी याचिकाकर्ते संजय भालेराव आणि त्यांचे वकील नितीन सातपुते यांच्याशी केलेली खास बातचीत...



भीमा कोरेगाव हिंसाचार 


भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पुण्यातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी तीन ते चार दिवस आधी चिथावणी दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. समाज कंटकांनी घातलेल्या या राड्यात काही जण जखमी झाले होते... तर एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तसेच ३० ते ४० वाहनांचं नुकसान करण्यात आलं होतं. भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईच्या २०० वर्षपूर्ती निमित्तानं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय तिथे जमला होता... या पार्श्वभूमीवर नगर रोड परिसरात हा राडा झाला होता.