राहुल गांधींनी कवितेच्या माध्यमातून साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
गुजरातमधील महिला आणि त्यांच्या सद्यस्थितीबाबत मुद्दा उपस्थित करत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या वेळी राहुल यांनी कवितेचा अधार घेत मोदींवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : गुजरातमधील महिला आणि त्यांच्या सद्यस्थितीबाबत मुद्दा उपस्थित करत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या वेळी राहुल यांनी कवितेचा अधार घेत मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ’22 सालों का हिसाब गुजरात मांगे जवाब, प्रधानमंत्रीजी – 5वां सवाल’ या शिर्षकाखाली लिहिलेल्या कवितेच्या रूपात महिलांच्या समस्या मांडत मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी कवितेच्या माध्यमातून महिला, शिक्षण आणि महिला सुरक्षा आदी गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधताना राहुल यांनी म्हटले आहे की, 'नाही आरोग्य, नाही शिक्षण, नाही पोषण. महिलांना मिळाले केवळ शोषण. अंगणवाडी सेविका आणि आशा, सर्वांचीच झाली निराशा. गुजरातच्या बहिणींशी केला केवळ वादा. तो पूर्ण करण्याचा कधीच नव्हता इरादा', अशा पद्धतीने राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे.
सध्या गुजरातमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाला आता शेवटचे काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांवर तुटून पडले आहेत. पंतप्रधान मोदींनी तर, प्रचाराचा मॅरेथॉन धडाका लावत एका दिवसात 7 सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. तसेच, मोदींनी राहुल गांधी आणि गांधी घराण्याला केंद्रीत करून कॉंग्रेसवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. मोदींच्या या हल्ल्याला कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पहिल्यांदाच तोडीस तोड उत्तर देताना दिसत आहे. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांचे एक कसलेला राजकीय नेता असे पहिल्यांदाच दर्शन होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटातही आनंदाचे वर्तन आहे.