.. पंतप्रधान मोदींच्या आवडत्या मशरूमविषयी माहितेय का ?
मशरूमच्या आवडीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी एकदा स्वत:च सांगितले.
नवी दिल्ली : गुजरात निवडणूकीच्या शेवटच्या दिवशी अल्पेश ठाकूर यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. पंतप्रधान मोदी दिवसाला ५ मशरूम खातात आणि एका मशरूमची किंमत ८० हजार रूपये असते. या मशरूममूळेच पीएम मोदींचा रंग गोरा आहे, असेही अल्पेश ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.
खासियत काय
भारतामध्ये धर्म आणि राजकारणात नेहमीच खाण्यापिण्याच्या गोष्टी जोडल्या जातात. खाण्याच्या सवयीवरून एखाद्याची जात, धर्म यांचा अदाज लावला जातो.
एका मशरूमची किंमत ८० हजार असेल तर त्याची खासियत काय असेल ? मशरूमची किंमत ७ ते ८ लाख रूपये किलो आहे. त्यामूळे यांची तस्करीदेखील होत असते.
१० ते ३० हजार रु. किलो
भारतातील उच्च आणि मध्य हिमालय ( उत्तराखंड, हिमाचल आणि काश्मीर) मध्ये गुच्छी मशरूम मिळते.
मशरूमच्या आवडीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी एकदा स्वत:च सांगितले. हे मशरूम साधारणत: १० हजार ते ३० हजार रुपये किलो. रुपये किंमतीने मिळते. याला उगवले जात नाही ते स्वत: उगते.
आरोग्यवर्धक
पोटेशिअम आणि मिनरल्ससाठी मशरूम खाणे चांगले असते. आपल्याइथे मिळणारा बटण मशरूम कॅंसरसोबत लढण्यास मदत करतो.