Ratan Tata Love Story : रतन टाटा... एक यशस्वी उद्योजक, दानशूर व्यक्तीमत्व, दिलदार माणूस आणि प्रत्येकाचे प्रेरणा स्थान. आयुष्यात यशाचा उत्तुंग शिखर गाठणारा हा रॉयल माणूस प्रेमात मात्र, सपशेल अयशस्वी ठरला. रतन टाटा एका अमेरिकन तरुणीवर जीवापाड प्रेम करत होते. मात्र, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. खरं प्रेम मिळालं नाही म्हणून रतन टाटा अजूनपर्यंत अविवाहित  राहिले आहेत. रतन टाटा(Ratan Tata) यांची प्रेमकहाणी (Love Story) देखील तितकीच प्रेरणादायी अशी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वी बडोदा मॅनेजमेंट असोसिएशन (BMA) च्या एका कार्यक्रमात रतन टाटा यांनी आपले अनेक वैयक्तिक अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले होते. यामध्ये त्याने आपल्या प्रेमकहाणीचाही  देखील उल्लेख केला होता. यावेळीच त्यांनी आपली प्रेमकहाणी देखील तरुणांना सांगितली. 


'आयुष्यात मी 4 वेळा प्रेमात पडलो, पण चारही वेळा मला अपयश आले असे रतन टाटा यांनी सांगितले. अमेरिकेत काम करत असताना रतन टाटा एका मुलीच्या प्रेमात पडले.  टाटा आणि तिच्यासह लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यावेळी 1962 चे भारत-चीन युद्ध सुरू होते. रतन टाटा भारतात आले, पण युद्धादरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे ज्या तरुणीवर प्रेम होते ती भारतात येऊ शकली नाही. अखेर त्या तरुणीने दुसऱ्याशी लग्न केले.