मुंबई : भारत एक कृषीप्रधान देश आहे. जवळपास ७० टक्के लोकसंख्या आज शेतीवर अवलंबून आहे. सध्या आधुनिकरण झालंय. शेतीत ट्रॅक्टरचा वापर केला जातो. ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी सुखकर शेती करू शकतो. मात्र तुम्ही कधी ट्रॅक्टरचा विचार केला आहे का? ट्रॅक्टरचे पुढचे चाक हे लहान आणि मागचे चाक हे मोठे का असतात. तुम्हाला यामागचं कारण माहित आहे का? 


दोन्ही चाकांचे उद्देश वेगळे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रॅक्टरमधील मागच्या पुढच्या अशा सगळ्या चाकांचे उद्देश वेगळे आहेत. ट्रॅक्टरचे हँडलिंग, त्याची ग्रीप, बॅलेन्स, तेल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आली आहे. 


ट्रॅक्टरचे पुढचे चाक लहान असल्या मागचं कारण 


ट्रॅक्टरच्या पुढच्या लहान चाकामुळे त्याची दिशा ठरते. ही चाके थेट स्टेअरिंगशी संबंधित आहेत. स्टेअरिंग फिरण्यावरच ही चाके फिरतात. 


मोडवर स्पेस कमी असल्यामुळे ते फिरवू शकतो. यामुळे ट्रॅक्टरवर समोर जागेची गरज लागत नाही. तसेच लहान चाक असल्यामुळे इंजिनवर वजन कमी पडतं. त्यामुळे इंधन देखील कमी लागतं. 


ट्रॅक्टरची मागची चाके मोठी असण्यामागचं कारण 


ट्रॅक्टर कोणत्याही कार किंवा बाइकच्या तुलनेत अधिक चिखलातही उत्तम काम करतो. ट्रॅक्शन कमी असल्यामुळे कार किंवा बाइक चिखलात फसतात. मात्र मागचे टायर मोठे असल्यामुळे ट्रॅक्टर चिखलातून सहज बाहेर येतात. 


ट्रॅक्टरमध्ये मागे मोठे चाक असल्यामुळे ते कधीच चिखलात अडकत नाही. तसेच ट्रॅक्टरचे इंजिन पुढे असते त्यामुळे वजनाचा समतोल सांभाळण्यासाठी मागे मोठ्या चाकांची गरज असते. 


तसेच वजन उचलताना किंवा फिरताना ट्रॅक्टर पुढून कधीच वर उचलत नाही.