मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी विमानात बसला असेल किंवा विमानाला पाहिलं असेलच. बहुतेक विमान हे पांढऱ्या रंगाचे असतात. ज्यावर त्या-त्या कंपनीचा लोगो किंवा ट्रेडमार्क रंग असतो. परंतु असं असलं तरी विमानाचा मुळ रंग संपूर्णपणे बदलत नाही. तो नेहमीच पांढरा दिसतो. परंतु तुम्हाला असा प्रश्न पडलाय का, की असं का केलं जातं. तर आज आम्ही तुम्हाला यामागील काही कारणं सांगणार आहोत. चला जाणून घेऊ विमानाला पांढरा रंग देण्यामागचं वैज्ञानिक आणि आर्थिक महत्व.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानाला पांढरा रंग असण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सूर्याची किरणं. पांढर्‍या रंगामुळे सूर्याची किरणे विमानापासून पुन्हा परावर्तित होतात. जेव्हा असं होतं. तेव्हा विमानाचे तापमान वाढत नाही.


पांढऱ्या ऐवजी जर विमानाला दुसरा रंग वापरला, तर विमान ती किरणं शोषून घेईल आणि त्याचे तापमान वाढेल.


विमान पांढरं असल्यामुळे जास्त गरम होण्याचा धोका कमी असतं. आपल्याला हे देखील लक्षात घ्यावे लागेल की, विमाने फक्त उंचावरच उडत नाहीत तर ते तासन्तास उन्हात धावपट्टीवर उभे राहतात. ज्यामुळे पांढरा रंग अशा समस्यांपासून संरक्षण करतो. ज्यामुळे विमानाला हा रंग वापरला जातो.


विमाने उंचावर उडतात. ज्यामुळे त्यांचा रंग पांढरा ठेवला नाही तर तो कालांतराने फिकट होऊ लागतो. असं झाल्यास, विमानाचा मेंटेनन्स खूप जास्त होतं. त्यामुळे खर्चात वाढ होईल. ज्यामुळे विमान कंपनीचे नुकसान होईल किंवा जर खर्च वसूल करण्यासाठी तिकिटांच्या किंमती वाढवाव्या लागतील. त्यामुळे त्याचा रंग पांढरा ठेवला आहे.


बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, विमानाचा रंग पांढरा असेल, तर विमानाला झालेले नुकसान सहज लक्षात येते. असे झाल्यावर, मेन्टेनन्स करणं सोपं होते.


याशिवाय विमानाचा पांढरा रंग पक्ष्यांना विमानावर आदळण्यापासून रोखतो. पक्ष्यांना गडद रंगामुळे धोका ओळखणं कठीण होतं. ज्यामुळे विमानाला पांढला रंग दिला जातो.