मुंबई : फॅशन कायमच बदलत असते. जीन्स फॅशनमधील एक महत्वाचा भाग आहे. अजून जीन्सला रिप्लेस करता येईल अशी कोणती नवी फॅशन आलेली नाही. अनेकदा महिला जीन्स घालणं जास्त कम्फर्टेबल समजतात. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की मुलींच्या जिन्सचे पॉकेट हे मुलांच्या जिन्सच्या पॉकेटपेक्षा का लहान असतात? लहान पॉकेट असल्यामुळे खिशात अनेक वस्तू ठेवता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचं उत्तर एका फॅशन डिझाइनरने दिलं आहे. जवळपास 10 वर्षांहून अधिक काळ फॅशन डिझाइन या क्षेत्रात असलेल्या एमिली केलरने (Emily Keller) याची तीन उत्तरं दिली आहेत. पहिलं महत्वाचं कारण कॉस्ट कटिंग, दुसरं कारण - पॉकेटचं कापड कमी असल्यामुळे कंपनीचा फायदा आणि तिसरं कारण म्हणजे फॅशन ट्रेंड. जाणून घेऊया या तिन्ही कारणांची सविस्तर उत्तर. 


कॉस्ट कटिंग हे पहिलं करण 


महिलांच्या जीन्सची पॉकेट पुरूषांच्या जीन्सच्या पॉकेटपेक्षा लहान असल्याचं कारण म्हणजे कॉस्ट कटिंग हे आहे. 10 वर्षांपासून फॅशन जगतात असलेल्या डिझाइनर एमिली केलरने सांगितलं की, जीन्स करता लागणारा कपडा वाचतो. जेणे करून अधिक कपडा लागणार नाही. 


अनेक कंपन्या महिलांच्या जीन्सला पॉकेट देत नाही. फॅशनच्या नावाखाली कपडा वाचवण्याचा मुख्य हेतू असतो. यामुळे अनेक कंपन्यांना फायदा झाला आहे. 


पॉकेटचा भाग स्ट्रेच होण्याची भीती 


यासोबतच एमिली म्हणाली की, जर महिलांच्या जीन्समध्ये पॉकेट केलं गेलं तर तो कपडा स्ट्रेच होतो. या कारणामुळे पॉकेटची जागा छोटी ठेवण्यात आली आहे. 


फॅशन ट्रेंडमुळे पॅकेटची साईज होते छोटी 


हल्लीची फॅशन ट्रेंड लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. फॅशन ट्रेंडचा मुख्य कारण देत महिलांच्या जीन्सचे पॉकेट लहान झाले आहेत.