पत्नी करवाचौथचे व्रत ठेवत नाही म्हणून घटस्फोट
पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाचा हा निर्णय काय ठेवला.
नवी दिल्ली : पत्नी करवाचौथचे व्रत ठेवत नाही तसेच मित्रांना खायला देत नाही म्हणून पतीने घटस्फोट मागितला. पतीने फॅमिली कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली. आपले मित्र घरी येतात तर पत्नी त्यांना खायला देण्यास नकार देते. म्हणून पत्नीसोबत घटस्फोटाची मागणी त्याने फॅमिली कोर्टात केली. या निर्णयाविरोधात महिलेने उच्च न्यायालयात धाव घातली. त्यानंतर पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाचा हा निर्णय काय ठेवला.
याचिकाकर्ता भारतीय वायुसेनेमध्ये गुजरात येथे नोकरीस आहे. त्यांचा २०११ मध्ये विवाह झाला. त्यानंतर त्याला आपल्या परिवाराला गुजरातला न्यायचे होते. पण त्याच्या सासुला हे मान्य नव्हते. काही दिवसांनंतर मेव्हण्याने तिला गुजरातमध्ये नेऊन सोडले होते.
माझी पत्नी क्रूर स्वभावाची आहे. आपले कर्तव्य ती योग्यप्रकारे पार पाडत नाही. ती माझ्यासाठी करवाचौथचे व्रत देखील ठेवत नाही. आपल्या परिवारासोबत ती दिवाळीसारखे सण साजरे करत नाही. घरी आलेल्या मित्रांना ती खायला देत नाही. तसेच माझ्या परिवाराविरोधात तिने तक्रार दाखल केल्याचेही त्याने म्हटले.
पत्नी माझ्या परिवाराविरोधात नकारात्मक विचार ठेवते. तसेच सार्वजनिक ठिकाणांवर ती आपल्याला अपमानीत करते. पतीची ही बाजू योग्य मानून उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.