मुंबई : नवरा-बायकोचं नातं हे फार सुंदर नातं आहे. दोघेही एकमेकांसाठी आयुष्याचे जोडीदार असतात. कारण संपूर्ण आयुष्य त्यांना एकमेकांसोबतच घालवायचं असतं. परंतु यासाठी दोघांनाही त्यांच्या जोडीदार पसंत यायला हवा. तरंच हे नातं पुढे जाऊ शकतं. जर जोरजबरदस्तीने हे नातं टिकवण्याचा प्रयत्न केला, तर ते शक्य होत नाही. असाच एक प्रकार मध्यप्रदेशमधून समोर आला आहे. ज्यामध्ये बायकोने कोर्टा समोर आपल्या नवऱ्याला सोडण्यामागचं एक कारण सांगितलं, ज्यामुळे कोर्टाला देखील धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर काही दिवसांनी ही महिला माहेरी गेली आणि तेव्हापासून ती नवऱ्याकडे परत आलीच नाही. ज्यानंतर नवऱ्याने बायकोला घरी आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याने तिला फोन केला, तो तिला भेटायला देखील गेला. परंतु ती काही त्याच्यासोबत परत यायला तयार नव्हती. यामागे तिने कारण दिले की, तु चांगला दिसत नाही, ज्यामुळे मला तुझ्यासोबत यायचं नाही.


यानंतर नवऱ्याने कोर्टाचे दार ठोठावले. ज्यावर कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.


बिलासपूर उच्च न्यायालयाने एका पुरुषाची घटस्फोटाची याचिका स्वीकारली, न्यायालयाने म्हटले की, पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध असणे हा निरोगी वैवाहिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.


बिलासपूर उच्च न्यायालयाने लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या जोडप्याचे वागणे क्रूरतेच्या बरोबरीचे ठरवले आहे. याला महत्त्व देत न्यायालयाने तरुणाची घटस्फोटाची याचिका मान्य केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, लग्नानंतर पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर हे नातं चांगल्या प्रकारे चालणार नाही.


बिलासपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे 15 वर्षांपूर्वी 25 नोव्हेंबर 2007 रोजी लग्न झाले होते. बेमेटारा जिल्ह्यात राहणारी महिला तिचे वडिल वारल्यानंतर माहेरी गेली. यादरम्यान पती पत्नीला फोन करत तिला घरी आणण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ती आली नाही.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, पती सुंदर दिसत नाही, असे म्हणत पत्नीने पतीकडे येण्यास नकार दिला. तरूणाने घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे की, लग्नानंतर काही दिवस त्याची बायको क्रूरपणे वागायची आणि मानसिक छळ देखील करायची. याप्रकरणी उच्च न्यायालयाने तरुणाची याचिका मान्य केली