नवी दिल्ली : विकिलीक्सने आधारकार्ड विषयी गौप्यस्फोट केला आहे. आधार कार्डसाठी भारत सरकारने जमवलेला नागरिकांचा बायोमेट्रिक्स डेटा अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयए चोरू शकते, असं विकिलीक्सने म्हटलं आहे, मात्र भारत सरकारने हा दावा तातडीने खोडून काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकिलीक्सने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, अमेरिकेची क्रॉसमॅच टेक्नॉलॉजीस ही कंपनी जगभरातल्या वेगवेगळ्या संस्थांना बायोमट्रिक्स डेटा कलेक्ट करण्याची साधने आणि तंत्रज्ञान पुरवते. भारत सरकारच्या आधार प्राधिकरणालाही याच कंपनीने बायमेट्रिक्स कलेक्ट करण्याचं तंत्रज्ञान पुरवलं आहे. 


ही कंपनी सीआयएसाठीही काम करते. त्यामुळे त्या कंपनीकडे असलेला आधार डेटा सीआयएकडून सहज अॅक्सेस केला जाऊ शकतो.


भारतीय अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळताना म्हटले आहे, 'आधार प्राधिकरणाने देशातील नागरिकांचा जमा केलेला आधार हा पूर्णपणे सुरक्षित आणि एनक्रीप्ट असून तो कुणालाही लीक करता येत नाही'.