मुंबई : आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात. वाईल्ड लाईफसंदर्भात देखील आपण बरेच फोटो किंवा व्हिडीओ इंटरनेटवर पाहातो. सध्या असेच काही फोटो समोर आले आहेत. जे नेटीझन्सकडून खूपच पसंत केले जात आहेत. हे फोटो केनियातील मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमध्ये कॅनेडियन व्यावसायिक छायाचित्रकार जेफ्री वू यांनी हे फोटो टिपले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


त्यांनी टिपलेल्या या फोटोमध्ये  जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी चित्ता शिकार करताना दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला चित्त्याला शिकार करण्याची अवगत असलेली कला बारकाईने पाहायला मिळत आहे.



या शिकारीची मालिका तुम्हाला 'या' फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. जे खूपच आकर्षक आहे. ज्यामुळे हे फोटो सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षीत करत आहे.



या फोटोंमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला आणि लोकांना आवडलेला फोटो म्हणजे चित्त्याने हवेत उडी मारून हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न. या फोटोला पाहून एका IFS अधिकाऱ्याने कमेंट करत सांगितले की, याला म्हणतात वाइल्ड फोटो!


मोठ्या मांजरींच्या कुटुंबातील हा सदस्य (चित्ता) ताशी 100 किलोमीटर वेगाने धावू शकतो. इम्पालाचा वेग कमी होत नसला तरी शिकारीसमोर शिकार कमकुवत होतो.