मुंबई : साहसी खेळाशी संबंधित सामान आणि बॅग बनवणारी भारतीय कंपनी Wildcraft ला भारतीय लष्कराकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही कंपनी आता नायकी, अदिदास, रीबॉक, पुमा सारख्या कंपन्यांना मागे टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. Wildcraft ही कंपनी सर्वात मोठी लाइफस्टाइल कंपनी बनण्याच्या प्रयत्नात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीचे संस्थापक गौरव डबलिश आणि सिद्धार्थ सूद यांनी भारतीय लष्कराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवणार आहे. त्याचप्रमाणे कंपनीची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींपर्यंत नेण्याचा उद्देश देखील असल्याचा यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या काळात देशाला संबोधत करताना 'आत्मनिर्भर' होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर Wildcraft या कंपनीने आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलली आहेत. 


भारतीय लष्कराकडून मिळालेली ही ऑर्डर सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मागील वर्ष संपण्याआधीच भारतीय लष्कराने कंपनीशी करार केल्याचं सांगतात. भारतीय लष्करासाठी बँगांबरोबरच कंपनीने कोरोनाचे संकट लक्षात घेता खासगी सुरक्षेसंदर्भातील वस्तूंच्या निर्मितीची सुरूवात देखील कंपनीने केली आहे. मास्क, पीपीई किट सारख्या गोष्टींची निर्मिती देखील कंपनीने केली आहे. 


लष्कराची ऑर्डर


Wildcraft ला मागील वर्षी लष्कराकडून मोठी ऑर्डर मिळाली असून या ऑर्डरनुसार कंपनी लष्करासाठी दोन लाख रकसॅकची निर्मिती करणार आहे. ९० लीटरच्या या रकसॅकची डिझाइन आणि इतर गोष्टींना संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या बँगांच्या चाचण्याही झाल्या असून संरक्षण मंत्रालयाने कंपनीला निर्मितीला सुरुवात करण्यास सांगितले आहे. कंपनीचे सध्या कर्नाटकमधील बेंगळूरु आणि हिमाचल प्रदेशमधील सोनालमध्ये दोन मोठे कारखाने आहेत. लवकरच कंपनी देशातील ११ शहरांमध्ये ६५ नवे निर्मिती युनिट्स उभारणार असून एक लाख लोकांना रोजगार देणार असल्याचे समजते.



किती आहे वाइल्डक्राफ्टची तयारी 


बंगलुरू कंपनी वाइल्डक्राफ्टने वर्षाचा आर्थिक व्यवहार हा ३५ ते ४० टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये कंपनीने ४०० करोड रुपयांचा व्यवसाय केला. तर २०१७-१८ मध्ये ५०० करोड रुपयांचा. आता कंपनीने २०००-२१ मध्ये १००० करोड रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.