नवी दिल्ली : काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत राज्यातील काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.  थोड्याच दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी काही जागांवरुन तिढा कायम आहे. त्यामुळे आघाडीत दावे-प्रतिदावे दोन्ही काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पुण्याच्या जागेवर दावा केला आहे. तर काँग्रेकडून राष्ट्रवादीच्या अहमदनगर जागेवर दावा केला आहे. राष्ट्रवादी अहमदनगरची जागा सोडण्यास तयार नाही. तसेच काँग्रेसकडून पुण्याची जागा सोडण्यास नकार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सध्या धूसफुस सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यातच काँग्रेसकडून महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यात आली  आहे. तशी नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहेत.


नागपुरात काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले vs नितीन गडकरी सामना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, रामटेकमधून मुकुल वासनिक यांना संधी मिळणार आहे. तर यवतमाळमधून माणिकराव ठाकरे आणि नांदेडमधून अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळणार आहे. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. नागपूरमधून नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसकडून नाना पटोले यांना मैदानात उतरवण्याची चर्चा आहे. नाना पटोल यांना नागपुरातल्या उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आलीय. यावेळी नाना पटोले यांनी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सांगितले.


काँग्रेसची पहिली यादी जाहीर


हे असणार काँग्रेसचे उमेदवार?


 - सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, 
- रामटेकमधून मुकुल वासनिक, 
- यवतमाळमधून  माणिकराव ठाकरे, 
- नांदेडमधून अमिता चव्हाण, 
- दक्षिण मुंबईतून  मिलिंद देवरा 
- नागपूरमधून नाना पटोले