बंगळुरू : एक इंच जागा इतरांना देणार नाही, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिलाय. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाच्या पार्श्वभूमिवर येदीयुरप्पा यांचं हे विधान आहे. महाजन आयोगानुसार अनेक भागांचं विभाजन करून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना देण्यात आलंय. या मुद्द्यांवरून वाद निर्माण करणं योग्य नसल्याचं येडीयुरप्पा यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी गुरूवारी केलं होतं.


'त्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभं करून गोळ्या घाला'


महाराष्ट्र - कर्नाटकचा सीमाप्रश्न गेल्या ६० वर्षांपासून भिजत पडला आहे.  इथल्या मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर अगोदर मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर उभं करून गोळ्या घालून विषय संपवा, असं वादग्रस्त वक्तव्य भीमाशंकर पाटील यांनी केलं होतं. मराठी भाषिकांनी कर्नाटकच्या स्वाभिमानाला नेहमीच धक्का पोहचवल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.


'एकाही सदस्याच्या केसालाही धक्का लागला तर शिवसेनेशी गाठ'


भीमाशंकर पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सीमाभागात संतप्त पडसाद उमटले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकाही सदस्याच्या केसाला धक्का लागला तरी गाठ शिवसेनेशी आहे असा सज्जड इशारा खासदार धैर्यशील मानेंनी दिला.