खराब रस्ते बनवले तर कंत्राटदारांवर बुलडोझर चालवणार - नितिन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी असं म्हणाले, `...अन्यथा कंत्राट दारांवर बुलडोजर चढवणार`.
नवी दिल्ली : एका पुस्तक प्रकाशनात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी असं म्हणाले, '...अन्यथा कंत्राट दारांवर बुलडोजर चढवणार'. सर्वोच्च न्यायालयाने रस्त्याच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केल्यानंतर, गडकरींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने म्हटलंय, 'रस्त्यावरील अपघातात देशात १४ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो, याला जबाबदार रस्त्यावरील खड्डे आहेत.' ही संख्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पावणाऱ्या लोकांपेक्षा अधिक आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अशा लोकांचे मृत्यू हे पटत नाहीय.
कंत्राटदारांना दिलासा
केंद्रीय मंत्री म्हणाले 'मी मोठ्या कंत्राटदारांना म्हणालो आहे की, जर तुमच्याकडून तयार केलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेत निकृष्ट आढळले, तर बुलडोझर चढवला जाईल.' त्याचबरोबर गडकरी यांनी सांगितले की, मंत्रालयाने साडेचार वर्षात १० हजार अब्ज रुपयांचे रस्ते बनवण्याचं कंत्राट दिलं आहे. पारदर्शकतेशी संबंधित चिंता दूर करुन कोणत्याही कंत्राटदारांना कामासाठी दिल्लीत येण्यासाठी मजबूर केलं जात नाही.
रस्ते निर्मितीला वेग
गडकरी म्हणतात, आमचं सरकार आलं तेव्हा रस्ते निर्मितीचा वेग प्रतिदिवस २ किलोमीटर होता, पण यात वाढ होऊन प्रतिदिवस २८ किलोमीटर झाली आहे. मार्च २०१९ पर्यंत याचा वेग प्रतिदिवस ४० करण्याचं आपलं लक्ष्य आहे. तसेच देशभरात १२ नवीन एक्सप्रेसवेवर काम चालू आहे. न्यायमूर्ती मदन बी लोकर यांच्या खंडपीठाने नाराजी केली आहे. यात ते म्हणाले आहेत, देशभरात खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. ही संख्या दहशती हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांपेक्षा अधिक आहे.