नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतं आहे. या बैठकीला काँग्रेससह १८ विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेचं कामकाज सुरुळीत चालावं आणि सा-यांनी सहकार्य करावं असं आवाहन सुमित्रा महाजन करतील. भारत-चीन सीमा वाद, काश्मीर स्थिती, शेतक-यांचा संताप, जीएसटी अशा विविध महत्त्वाच्या मुद्यांवर विरोधी पक्षाचे नेते चर्चा करण्याची शक्यता आहे.


खासदार विनोद खन्ना, पी. गोवर्धन रेड्डी यांच्या निधनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी कोणतंही काम होणार नाही. याच दिवशी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.