School Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी `ही` बातमी वाचा
Trending News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Winter Weather Update) पुन्हा परतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharastra Weather Update) थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
School Winter Vacations : नवीन वर्षाचं स्वागत हे कडाक्याची थंडी घेऊन आलं आहे. मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. राज्यात थंडीची लाट (cold wave) पसरताना दिसतं आहे. हवामान खात्याने अजून काही दिवस थंडी आपल्यासोबत असल्याचा इशारा दिला आहे. आज 11 जानेवारी 2023 ला उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह पुणे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबादच्या काही भागांमध्ये 10° किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित भागात सुमारे 12 डिग्री सेल्सियस तापमान असेल. तर मुंबई आणि आजूबाजूला कोकण भागात तापमान 16-18° तापमान राहणार आहे.
उत्तर भारतात थंडीचा कहर
देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात अजूनही थंडीचा कहर सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस थंडीची लाट कायम राहणार असून उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. पुढील चार दिवस शीतलहरीचा कहर पाहायला मिळेल. (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर (Jammu Kashmir), पंजाब (Punjab) या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्यासोबतच धुक्याचंही प्रमाण जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालकानों मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी जाणून ज्या तुमच्या राज्यातील शाळांना सुट्टी आहे का ते ? (Winter Weather Update Maharastra mumbaiand india cold wave school closed winter vacation marathi news)
उत्तर प्रदेशातील 'या' जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी
उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांतील शाळांना 14 जानेवारीपर्यंत सुटी देण्यात आली आहे. लखनऊ, आग्रा, बलिया, बुलंदशहर आणि हरदोईमध्ये 12वीपर्यंत शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. तर मैनपुरीमध्ये 8 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 12 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे.
दिल्ली
थंडीमुळे राजधानी दिल्लीतील शाळाही 15 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, या काळात 9वी ते 12वी पर्यंतचे अतिरिक्त वर्ग दिल्लीत सुरू राहतील. दिल्लीत सरकारसोबतच खासगी शाळांनाही 15 जानेवारीपर्यंत सुट्टी असेल.
बिहार
पाटणासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा 14 जानेवारीपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, 15 जानेवारीला रविवार असल्याने शाळा 16 जानेवारीला सुरू होतील. राजधानी पाटणामध्ये मॅट्रिकच्या परीक्षेशी संबंधित शैक्षणिक उपक्रम सुरू राहतील. मात्र त्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 3 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
झारखंड
झारखंडमधील शाळाही 15 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने केजी ते पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हरियाणा
हरियाणा सरकारने 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बोर्डाच्या परीक्षांमुळे दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू राहणार आहेत. पण, दहावी आणि बारावीचे वर्ग सकाळी 10 ते दुपारी 2वाजेपर्यंत चालतील.
पंजाब
पंजाबमधील भगवंत मान सरकारने मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी 13 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या सुट्ट्या 8 जानेवारीपर्यंत होत्या.