Repo Rate Hike : कर्ज घेताय? मग आधी ही बातमी वाचा, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Repo Rate Hike : गृहकर्ज, खासगी कर्ज किंवा अशा प्रकारचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही वाईट बातमी आहे.
Repo Rate Hike : सामान्य जनेतेला पुन्हा एकदा महागाईचा (inflation) झटका बसण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत (monetary policy meeting) मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीत, रिझव्र्ह बँक रेपो दरात 35 बेसिस पॉइंटच्या वाढीची घोषणा करू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सलग तीन वेळा 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केल्यानंतर व्याजरात (Interest) वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात जर तुम्ही गृहकर्ज, खासगी कर्ज किंवा अशा प्रकारचे कर्ज (Loans) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही वाईट बातमी आहे.
जेव्हा अर्थव्यवस्था महागाईच्या सावटाखाली असते तेव्हा आपल्या monetary policy मध्ये आरबीआयला महागाई नियंत्रणासाठी बदल करावे लागतात. त्यातील एक म्हणजे रेपो रेट वाढ. रेपो रेट आरबीआयकडून वाढवला तर कर्मशियल बॅंकांना व्याजदरात वाढ करावी लागते. कर्मशियल बॅंकाना आरबीआयकडून मिळालेल्या कर्जावरील (Loans) व्याजदर वाढवावा लागतो. या वाढीचा लोकांच्या मागणीवरही परिणाम होतो.
वर्षभरात पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दर वाढवत आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईच्या आकडेवारीत घट झाली असली तरी, तरीही ती आरबीआय आणि सरकारने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या बाहेर आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआय सातत्याने रेपो दरात बदल करत आहे. गेल्या दीड वर्षांत रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. तर यावर्षी रेपो दरात चार वेळा वाढ करण्यात आली आहे. आरबीआयने मे महिन्यापासून केवळ रेपो दरात वाढ केली आहे. सध्या रेपो रेट 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये महागाई दर हा 7.41 टक्के होता. तर ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर 6.77 टक्के होता.
रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट - आरबीआय इतर बँकांना अल्पमुदतीचा वित्तपुरवठा करताना जो व्याजदर आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. बँका याच पैशांमधून ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्याने बँकेकडून ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज मिळते. त्यामुळे ग्राहकांना गृहकर्ज, वाहन कर्जासोबत इतर खासगी कर्ज घेताना फायदा होतो.
रिव्हर्स रेपो रेट - रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटच्या उलट असतो. रिव्हर्स रेपो रेटमध्ये बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे जमा केलेल्या ठेवींवर व्याज मिळते. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून मार्केटमध्ये लिक्वीडीटी कायम राहते. बाजारामध्ये मोठ्याप्रमाणात चलन उपलब्ध असल्याने रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते. रिव्हर्स रेपो रेट वाढवल्याने बँका जास्त व्याज कमवण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडील रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करतील अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेला असते.