मुंबई : महामारी कोरोनाचा नुसताच आपल्या आरोग्यावरच नाही, तर आपल्या व्यवहारीक आयुष्यावर देखील वाईट परिणाम झाला आहे. कोरोनामुळे देशच काय तर संपूर्ण जग थांबलं होतं, ज्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना खाण्यासाठी ही अन्न नव्हतं. तर कोरानामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यामुळे लोकांनी आपला दिवस ढकलण्यासाठी जमा असलेले सगळे पैसे खर्च केले. परंतु या सगळ्यात भविष्य निर्वाह निधीने नोकरदारांना मोठा धीर दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळात लोकांनी जास्तीत जास्त निधी काढला. 2021 मध्ये 71 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे EPF खाते बंद केले.


परंतु अनेकांना हा प्रश्न पडला असेल की EPF काढणे खरंत योग्य आहे का?


ईपीएफ हा सेवानिवृत्ती बचत निधी आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की वेळेपूर्वी त्यातून पैसे काढ्याने तुमचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. परंतु आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नाही आणि अपूऱ्या माहितीमुळे आपण अनेकांचे नुकसान करतो. सदस्यांना सहसा असे वाटत नाही. परंतु, एकवेळ पैसे काढल्याने तुमच्या निधीचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. कसं ते समजून घेऊया.


एकवेळा पैसे काढल्याने किती नुकसान होते?


ईपीएफओचे निवृत्त सहायक आयुक्त ए.के. शुक्ला यांच्या मते, समजा तुमच्या निवृत्तीला 30 वर्षे शिल्लक आहेत आणि तुम्ही EPF खात्यातून 1 लाख रुपये काढले आहेत, तर यामुळे तुमचा सेवानिवृत्ती निधी 11.55 लाख रुपयांनी कमी होईल.


आपण टेबलच्या माध्यमातून पाहूयात की किती पैसे काढल्याने तुमचे किती नुकसान होईल


EPF विड्रॉल 20 वर्षानंतर किती नुकसान 30 वर्षानंतर किती नुकसान
50 हजार रुपये 2 लाख 5 हजार रुपये 5 लाख 27 हजार रुपये
1 लाख रुपये   5 लाख 11 हजार रुपये 11 लाख 55 हजार रुपये
2 लाख रुपये 10 लाख 22 हजार रुपये 23 लाख 11 हजार रुपये
3 लाख रुपये 15 लाख 33 हजार रुपये 34 लाख 67 हजार रुपये

टीप: टेबलमधील व्याज हा वार्षिक आधारावर (वर्तमान व्याज दर) मोजला गेला आहे.


अती महत्वाचे असल्याशिवाय कधीही पैसे काढू नका


ईपीएफओच्या नियमांनुसार, जेव्हा तुम्ही वयाच्या 57 व्या वर्षी निवृत्त व्हाल, तेव्हा हे पैसे तुम्हाला कामी येतील. तुमच्यासोबत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसेल तर तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढू नयेत. सध्या पीएफवर 8.5  टक्के व्याज मिळत आहे.


सर्व लहान बचत योजनांमध्ये हे सर्वाधिक व्याज आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात जितके जास्त पैसे असतील तितके जास्त व्याज तुम्हाला मिळेल. जर ईपीएफ खात्यातून पैसे काढले जात असतील, तर निवृत्ती निधीवरही तसाच परिणाम होईल.


भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान किती आहे?


EPFO च्या मते, दरमहा कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातून 12 टक्के पगार आणि महागाई भत्ता (मूलभूत पगार + DA) पीएफ खात्यात जमा केला जातो. नियोक्त्याच्या बाजूनेही योगदान आहे. पीएफ खात्यात दोन प्रकारचे फायदे आहेत.


EPF चा पहिला भाग आणि पेन्शनचा दुसरा भाग (EPS). नियोक्त्याच्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम पेन्शनमध्ये जमा केली जाते. त्याच वेळी, 3.67 टक्के भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा आहे. संपूर्ण पैशावर चक्रवाढीच्या आधारे व्याज मिळते, म्हणजेच दरवर्षी व्याजावरही व्याज मिळतो. त्यामुळे तुम्हाला अती महत्वाचे असल्याशिवाय कधीही यामधून पैसे काढू नका.