आता पाण्यातही तळता येणार टम्म फुगणाऱ्या पुऱ्या! कसं ते पाहा Recipe
How To Make Oil Free Puri : होळी, गुढीपाडवा, गणपती कोणताही सण किंवा लग्न समारंभ असल्यावर जेवणाच्या ताटात पुरी हा पदार्थ दिसतोच. पण पुरीत तेल दिसल्यानंतर ती खावीशी वाटत नाही. त्यामुळे तेलमुक्त पुरी कशी बनवायची ते जाणून घ्या...
How To Make Oil Free Puri in Marathi : सण असो किंवा लग्न समारंभ विशेष असतते जेवण. त्यातही मराठमोळे सण, लग्न असल्यास पुरील अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकंच काय पण घरात कधी कधी सुट्टीच्या दिवशीही पुरी (PURI) खाण्याता मोह आवरता येत नाही. पण अनेकदा पुरी तळताना त्या तेल राहते आणि ती खाण्यास योग्य नसते. पण असे नक्की का होते. मात्र आता टेन्शन घेण्याचे कारण नाही, कारण तुम्ही तेलचा वापर न करता पाण्यातही पुरी तळू शकता.
पुरीत तेल का राहते?
बरेचजण पुरीत तेल राहते म्हणून पुरी बनण्यासाठी टाळाटाळ करतात. विशेषतः ज्यांना गरमागरम पुरी खायला आवडते. पण काही सोप्या ट्रिक्स वापरून यातून सुटका मिळवू शकता. जर तुम्ही पुरीचे कणीक नीट न भिजवल्याने या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र आजीच्या बाटव्यातील या ट्रिक्स तुम्ही वापरल्या तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल.
पुऱ्या बनवण्यासाठी साहित्य : गव्हाचे पीठ, मीठ, ओवा, दही आणि पाणी
वाचा: काय? टेस्टी टेस्टी Panipuri आरोग्यासाठी असते फायदेशीर? जाणून घ्या जबरदस्त फायदे
अशी बनवा पाण्यात पुरी
सुरुवातील एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा टाका. त्यात एक चमचा दही टाका. आपण पुरी बनवताना तेलाचा एक थेंबही वापरणार नाही. म्हणूनच पाठीला मळताना तेलाऐवजी दह्याचा वापर करा. जेणेकरुन पुऱ्या नरम होतील. पीठ मळून त्याचे छोटे गोळे बनवा आणि पुऱ्या लाटून घ्या. त्यानंतर गॅसवर एका कढईत पाणी गरम करायला ठेवा. प पाणी बुडबुडे होईपर्यंत उकळवा. या उकळत्या पाण्यात पुरी टाका. जशा तेलात पुरी तळतो तश्या पाण्यात तळून घ्या. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पुरी शेकवून घ्या. पुरी थोडीशी फुगते आणि काही वेळाने पाण्यावर तरंगू लागतातड. त्यावेळी या पुऱ्या बाहेर काढा. तुम्ही नीट पाहिले तर पुऱ्यांचे रंग तेलात तळल्यावर बदलतो तसा बदलेले नाही. त्यामुळे तुम्ही या पुऱ्या आता खाऊ शकत नाही. आता तुम्हाला लागणार एअर फ्रायरची आवश्यकता असेल. पाण्यात तळलेल्या या पुऱ्या एअर फ्रायमध्ये टाका. तुम्ही आता पाहाल तर पुऱ्या तेलात तळतो तशा फुलल्या आहे. त्यावर तेल अजिबात नाही. आता तुम्ही या विना तेलाच्या पुऱ्या खाऊ शकता.