नवी दिल्ली : सर्प दंशाने एखाद्या इसमाचा मृत्यू झाल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. पण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
घडला धक्कादायक प्रकार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुजफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेला झोपलेली असताना तिला सर्प दंश झाला. मात्र, झोपेत त्या महिलेला कळलचं नाही. त्यानंतर महिलेने आपल्या चिमुकलीला दूध पाजलं आणि मग थोड्याच वेळात आई-चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजफ्फरनगरमधील मंडला गावात राहणाऱ्या महिलेला शुक्रवारी रात्री सर्पदंश झाला. पण सर्पदंश झाल्याचं त्या महिलेला कळलचं नाही. त्यानंतर जाग आल्यावर तिने आपल्या अडीच वर्षीय मुलीला दूध पाजलं. 


दूध प्यायल्यानंतर अवघ्या काही काळातच चिमुकलीची प्रकृती बिघडली. जोपर्यंत कुणाला हे प्रकरण कळेल तोपर्यंत चिमुकलीची प्रकृती खूपच बिघडली. त्यानंतर चिमुकलीला आणि तिच्या आईला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


रुग्णालयात दाखल करेपर्यंत खूपच उशीर झाला होता. कारण, रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी आई आणि चिमुकलीला मृत घोषित केलं.