Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या तिच्यापेक्षा 10 वर्ष लहान असलेल्या पुतण्यावर प्रेम जडले. मात्र, त्यांच्या या प्रेमाचा लोकांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर जे घडलं ते पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या कुटुंबातील लोकांना तर या प्रकरणाचा मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेचे तिच्यात पुतण्यावर प्रेम जडले. मात्र, दोघांच्या वयात तब्बल 10 वर्षांचे अंतर होते. काकी व पुतण्या दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र, त्यांच्या या प्रेम प्रकरणाची कुणकुण कुटुंबीयांनी लागली. त्यानंतर घरच्यांनी त्यांना नात्याला विरोध केला. मात्र तरीही त्यांनी नात पुढं नेण्याचंच ठरवलं. मात्र, कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा वाढता विरोध पाहून अखेर काकी आणि पुतण्याने धावत्या ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला आणि तिचा पुतण्या एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र, त्यांना सतत होणाऱ्या विरोधानंतर त्यांनी रविवारी धावत्या ट्रेनखाली येत आत्महत्या केली आहे. पुष्पादेवी असं या महिलेचे नाव आहे. पुष्पा देवी या त्यांच्या दोन मुलांसोबत इटियाथोक परिसरात त्यांच्या सासरीच राहतात. तिचे 22 वर्षीय रविंद्र कुमार यांच्यासोबत प्रेम जडले. नात्याने तो तिचा पुतण्या लागत होता. मात्र दोघंही प्रेमात ठार वेडे झाले होते. 


पुष्पादेवी आणि रविंद्र कुमार यांच्या प्रेमाला त्यांच्याच घरातून कडाडून विरोध होता. त्यांना रविंद्र कुमारचे लग्न दुसरीकडे करुन द्यायचे होते. त्यामुळं पुष्पादेवी नाराज होत्या. रविंद्रचं दुसरीकडे कुठे लग्न होऊ नये म्हणून त्या प्रयत्न करत होत्या. तसंच, सतत घरात व बाहेर मिळणाऱ्या टोमण्यांमुळं त्या वैतागल्या होत्या. या सगळ्या प्रकाराला वैतागलेल्या दोघांनीही जीव देण्याचा निर्णय घेतला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. रविवारी पुष्पा आणि रविंद्र यांनी कठुआ रेल्वे क्रॉसिंगजवळ धावत्या ट्रेन खाली उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाच्या कुटुंबात आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. मात्र दोन्ही मुलांना मागे ठेवून पुष्पा यांनी आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसही या प्रकाराने थक्क झाले आहेत. दोघांच्या आत्महत्येनंतर कुटंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे, पुष्पा हिच्या पतीचे आधीच निधन झाले आहे. त्यामुळं आता या दोन मुलांचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.