Train Viral Video : अनेकदा महिलांना सामाजिक ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा प्रवास करताना अश्लिल नजरांचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षात महिलेचा विनयभंग  (Woman Harassment) झाल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मात्र, महिलांनी आता अन्यायाविरोधात आवाज देखील उठवण्यास सुरूवात केलीये. त्यामुळे आता समाजाची मानसिकता बदलेल का? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. यामध्ये एक महिला एका पुरूषाला चपलेने मारहाण करताना (Woman Beats Man With Slippers) दिसत आहे. एका रेल्वेमध्ये प्रवास करताना ही घटना समोर आलीये. नेमकं काय झालं पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Train Viral Video) होतोय, ज्यामध्ये एक महिला ट्रेनच्या डब्यात एका पुरुषाला चप्पलनं मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये समोर बसलेला एक पुरूष अश्लील कृत्य करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केलीय. त्यानंतर आता सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. महिलाने काय काय केलं पाहा...


एक पुरूष समोरच्या बाकावर आपल्या बॅगसह बसला होता. त्यावेळी समोर बसलेल्या तरुणासोबत त्याने अश्लिल कृत्य केलं. महिलेला याचा राग आल्याने तिने तिथंच त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तिने आपली चप्पल काढली अन् पुरूषाला धु धु धुतलं. चपलेने सडासडा मारहाण करत तिने त्याचं कृत्य सर्वांसमोर उघड केलं. महिलेने केसं धरून धरून त्याला धडा शिकवला. त्यावेळी पुरूषाने हावभाव बसून चूक पुरूषाचं असल्याचं समजतंय. मात्र, अशा वेळी ट्रेनमधील प्रवासी फक्त दर्शक म्हणून बघत होते.


पाहा Video



दरम्यान, व्हायरल व्हिडिओ मायक्रोब्लॉगिंग साइट X वर @gharkekalesh या हँडलने पोस्ट केला आहे. या व्हायरल पोस्टला आतापर्यंत 30 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत. भारतीय रेल्वेमध्ये महिलेने विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवला, अशा मथळ्याखाली हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.