Necklace Gift On Diwali :  दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसतोय. ऑफिसपासून घरापर्यंत सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. कंदील, रोषणाई, रंगीबेरंगी कपडे आणि ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी...सोशल मीडियावरही दिवाळीमय झालंय. दिवाळी म्हटलं की भेटवस्तू आल्याच...कंपन्यांकडून कर्चमाऱ्यांना दिवाळीनिमित्त गिफ्ट दिले जातात. कोणी कर्मचाऱ्यांना मिठाई दिली तर एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना चार चाकी गाडी दिली. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलं ते पाहून, नेटकरी म्हणतायेत बॉस असावी अशी!


गिफ्ट पाहून कर्मचाऱ्यांचा डोळात पाणी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की तुम्हाला पण असा बॉस हवा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला बॉसने तिच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सरप्राईज देण्यासाठी ऑफिसच्या गच्चीवर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत त्यांने सर्व महिला कर्मचाऱ्यांना एकत्र उभे राहण्याची विनंती केली. सर्व महिला रांगेत उभ्या होताच सर्वांना हात पुढे करायला सांगितलं. मग महिला बॉस म्हणाली, "अगं, डोळे बंद करा, कोणीही फसवणार नाही." सगळ्यांनी हात पुढे केलं आणि मग डोळे मिटले. मग कर्मचाऱ्यांनी विचारलं हात पुढे का? यावर बॉस म्हणाले की तू हात पुढे केला नाहीस तर मी सरप्राईज कसे ठेवणार.


हे ऐकून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यानंतर, लेडी बॉसने त्यांच्या हातात हिऱ्याचा सेट ठेवला. नेकलेस बॉक्समधील लाईटही चालू होती. सर्वांचे हात समोर होते आणि बॉस एक एक करून प्रत्येकाच्या हातात बॉसचा हार ठेवला. 



सर्वांनी डोळे उघडताच आश्चर्यचकित झाले आणि बॉसने सांगितले की हा हिऱ्याचा हार आहे आणि तो सर्वांसाठी आहे. हे ऐकून सर्व महिला कर्मचाऱ्यांनी आनंदाने धावत येऊन बॉसला मिठी मारली. हा व्हिडीओ @Gulzar_sahab यांनी X वर शेअर केला होता, जो 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.