काय म्हणावं याला? ताईनं चक्क पार्लेजी बिस्किटाचे पकोडे बनवले अन्... Video Viral
Parle G Pakode Making Video: सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. जो पाहून तुम्हालाही कळीस वाटल्याशिवाय राहणार नाही.
Parle G Pakode Making Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून कधी कोणते विचित्र व्हिडीओ व्हायरल होतील हेही काहीच सांगता येत नाही. सध्या असाच एका व्हिजीओ व्हायरल होतो आहे जे पाहून तुमचं डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही. इंटरनेटवर सध्या या व्हिडीओनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी चक्क एक महिला चूलीवर पकोडे भाजते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की हे पकोडे चक्क पार्लेजी या बिस्किटापासून तयार केले आहेत. त्यामुळे या ट्रोलर्स याला सापटून ट्रोल करत आहेत. अशा प्रकारे ही विचित्र रेसिपी बनवल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना संतापही अनावर झाला आहे. सध्या या व्हिडीओखाली नेटकरी नकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे.
अनेकदा लोकं हे सोशल मीडियावर विक्षिप्त प्रयोग करताना दिसतात. कधी कुठल्या पदार्थांसोबत काय मिक्स केलं जाईल हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळे अशा व्हिडीओची जोरात चर्चा असते. फूड एक्सरेरीमेंटचे व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यात असे विचित्र पदार्थ टाकले जातात की काही विचारू नका. पकोडे हे आपल्याला इतके आवडतात की मस्त सुट्टीच्या दिवशी आपण ते हमखास बनवतो. त्यामुळे आपल्यालाही ते खावेसे वाटतात. मस्त गरमागरम पकोडे खाल्ल्यावर आपलाही एक वेगळाच मूड होतो. त्यातून पावसाळ्यात तर आपण हमखास पकोडे खातो. त्यामुळे नातेवाईकांसोबत आणि मित्र परिवारांसोबत पकोडे खाण्याची मजाच वेगळी असते. परंतु आता हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस वाटल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा : सोनाक्षी सिन्हा दिसते 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीसारखी; अभिनेत्रीची आई म्हणूनही पसरली होती अफवा
वडे किंवा पकोडे तयार करण्यासाठी आपण चण्याचे पातळ पीठ तयार करतो आणि मग त्यात मिश्रण टाकून ते वडे, पकोडे तळतो. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. एकीकडे ती बटाट्याचे सारण बनवते आणि मग बिस्किटांना लावते आणि त्याला चण्याचे पीठ लावून ते तळते. पकोडे तयार झाल्यावर ती सॉससोबत सर्व्ह करते. सध्या हा व्हिडीओ पाहून आपण नक्कीच हे पकोडे खाणार नाही. परंतु यामुळे मात्र नेटकरी तूफान कमेंट्स करताना दिसत आहेत.
अनेकांनी म्हटलंय की अशा पदार्थ बनवणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. अनेकांनी या व्हिडीओखाली तीव्र संताप व्यक्त केलाय.