Crime News In Marathi: झांशी येथील नवाबाद येथे विवाहित महिलेचा संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विवाहितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर, पतीच्या जबाबावर तिच्या माहेरच्या लोकांनी आक्षेप घेत तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. रोशनी प्रजापती असं मयत महिलेचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला बीटीसी प्रशिक्षित होती. तिला एका खासगी शाळेत नोकरी मिळाली होती. बुधवारी तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता. मात्र नोकरीवर रुजू होण्याआधीच तिचा संशयास्पद स्तितीत मृतदेह आढळला. मयत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला आहे. तसंच, पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. 


रोशनीच्या पतीला तिचं घराबाहेर फिरणं आवडत नव्हते. मात्र तिला नोकरी करायची होती. पण सुंदर पत्नी घराबाहेर गेल्यास तिचे दुसऱ्यांसोबत बोलणे-चालणे वाढेल, ही भिती त्याला होती. यावरुन दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. बुधवारी रोशनीच्या नोकरीचा पहिलाच दिवस होता. मात्र त्याआधीच तिचा मृतदेह घरात आढळला. 


पत्नीला घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये गेलेल्या पतीचे म्हणणे आहे की, तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.  मात्र विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी मुलीच्या हत्येचा आरोप तिच्या पतीवर केला आहे. मुलगी सुंदर असल्यामुळं तो तिला नोकरी करुन देत नव्हता, असं त्यांनी आऱोपात म्हटलं आहे. 


रोशनीचा पती कालीचरण एका खासगी बँकेत नोकरीला होता. तर रोशनी गृहिणी होती. मात्र तिला नोकरी करायची होती. पण तिच्या सासरच्या लोकांनी तिला नोकरी करण्यास नकार दिला होता. यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. काही दिवसांपूर्वीच कालीचरणला बँकेतून काढून टाकण्यात आलं होतं. तेव्हाच रोशनीला एका खासगी विद्यालयात नोकरी लागली होती. मात्र कालीचरणने नोकरी करण्यास नकार दिला होता. यावरुन दोघांत वाद झाले होते. 


कालीचरणच्या म्हणण्यानुसार, वाद झाल्यानंतर रोशनी खोलीत निघून गेली. मात्र बराचवेळ झाला ती बाहेर आली नाही म्हणून त्याने आत जाऊन बघितले तेव्हा तीने गळफास घेतल्याचे समोर आले. तेव्हा त्याने तिला खाली उतरवून डॉक्टरांकडे नेले. 


रोशनीच्या माहेरच्या लोकांनी तिच्या नवऱ्यावर खुनाचा आरोप केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच रोशनीने फोन करून त्यांच्यात झालेल्या वादाची माहिती दिली होती. तसंच, रोशनीने गळफास घेतल्याची माहिती कालीचरणने कोणालाही दिली नाही. पोलिसांनाही सांगितले नाही. रोशनीच्या अंगावर जखमेच्या खुणा आहेत. तिच्या मृत्यूनंतर त्यांना सांगण्यात आले. संतप्त नातेवाईकांनी नवााबाद पोलिसांना तक्रार दिली आहे. दुसरीकडे, एसपी सिटी ज्ञानेंद्र सिंह म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.