Viral Gym Wedding Shoot Photo: सोशल मीडियावरती तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. खासकरून सोशल मीडियावर हौशी नेटकऱ्यांचेही अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एका व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. आता लग्नाचा सिझनही सर्वत्र सुरू झाला आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अतरंगी आणि फनी व्हिडीओही सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतात. आता अशातच तुमचं मनोरंजन करणारा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी चक्क एका नववधूनं जीममध्ये बसून हटके फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी चक्क जीममध्ये फोटोशूट करताना पाहून नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकालच्या जगात फीटनेस हा सर्वात महत्त्वाचा झाला आहे. त्यातून आता जीमकडेही तरूणाई जोरात वळताना दिसते आहे. त्यातून तरूणी मुलीही जिमप्रेमी झाल्या आहेत. अशातच आता या तरूणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय. त्यातून लग्न ठरलं की मग लग्नाच्या आधी प्री-वेडिंग शूटचीही जोरात चर्चा असते. कधी हटके तर कधी अतरंगी तर कधी त्याहूनही फारच सुंदर असं फोटोशूट करण्यात येते. सोशल मीडियावरही अशा फोटोशूटचे व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होताना दिसतात. आता या नव्या व्हिडीओचीही बरीच चर्चा रगंलेली आहे. प्री - वेडिंग शूट म्हणजे रोमॅण्टिक शूट. त्यासाठी अनेक प्रकारची ठिकाणं ही शोधली जातात. त्यासाठी समुद्र, परदेशातील एक ठिकाणं अथवा शांत असं कुठलं तरी जंगल अशी नाना तऱ्हेची ठिकाणं असतात. 


अगदी शहरातही कुठेतरी रस्त्यावरील वर्दळ सुरू असतानाही तिथं फोटोशूट केलं जातं. आता तर या महिलेनं चक्क जीममध्ये अगदी साडी आणि दागिने घालत तिनं अनोखं फोटोशूट केलं आहे. यावेळी तिनं केशरी आणि लाल रंगाची साडी परिधान केलेली होती. त्याचसोबत तिनं केसांची वेणी बांधली असून तिनं दागिनेही परिधान केले आहेत. यावेळी तिनं डंबल्स हातात घेतले आहेत. ज्यात ती हटके फोटोशूट करताना दिसते आहे. @hasanajarurihai या इन्स्टाग्राम अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 



प्री-वेडिंग शूट हे सध्या भलतेच व्हायरल होते. कधी बॉलिवूड थीम असते तर कधी आगळ्या वेगळ्या थीमचीही चर्चा असते. सध्या या महिलेच्या फोटोशूटनं सर्वांना वेड लावलं आहे. या व्हिडीओखीालीही अतरंगी कमेंट्स येत आहेत.