स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या `या` अटी
Trending News In Marathi: स्मार्टफोनचे व्यसन सोडवणे हे हल्ली कठिण होऊन बसले आहे. पण एका महिलेने यावर भन्नाट तोडगा काढला आहे.
Trending News In Marathi: आजच्या काळात स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. मात्र, फोनच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहे. फोनच्या अतिवापरामुळं आरोग्याला धोका तर येतोच पण त्याचबरोबर कामात आणि नात्यातही दरार येते. व्हर्चुअल गोष्टी आणि सोशल मीडियाचे आभासी जग यामुळं खरी नाती दुरावत जात आहेत. आपल्या आयुष्यातील मित्रांचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. अलीकडेच महिलेने तिच्या कुटुंबाचे मोबाइलचे व्यसन सोडवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. इंटरनेटवर सध्या तिची या आयडियाचे चांगलेच कौतुक होत आहे.
मोबाइलचा अतिवापरामुळं मुलं आपल्याच कुटुंबापासून दूर होतात. त्यावरच तोडगा काढण्यासाठी मंजू गुप्ता नावाच्या एका महिलेने एक चांगली आयडिया शोधून काढली आहे. सध्या तिचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. मंजु यांनी मोबाइलचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना एका स्टॅम्प पेपरवर सही करायला लावली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कुटुंबातील सदस्य एकमेकांऐवजी मोबाइल अतिप्रिय आहे. त्यामुळंच तिने शक्कल लढवली आहे.
नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर हिंदीत लिहलेल्या करारात तीन नियम सांगण्यात आले आहेत. यात फोन वापराबाबत नियम सांगण्यात आले आहेत. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य सकाळी उठतील तेव्हा सर्वप्रथम त्यांनी सूर्याकडे बघितलं पाहिजे. फोनला हातही लावायचा नाही. दुसरा नियम म्हणजे, डायनिंग टेबलवर जेव्हा सगळे जेवण करण्यासाठी एकत्र येतील तेव्हा फोनचा वापर अजिबात करायचा नाही. तर, तिसरा नियम म्हणजे, बाथरुममध्ये फोन अजिबात घेऊन जायचा नाही. कारण तिथे रील्स बघत बसल्याने वेळ फुकट जातो, असे तीन नियम करारात सांगण्यात आले आहेत.
तसंच, करारात असाही उल्लेख करण्यात आला आहे की, हा निर्णय आम्ही अजिबात रागात घेतलेला नाहीये. जेव्हा माझ्या मुलांनी मला नेटफ्लिक्सवर खो गए हम कहा दाखवला तेव्हा मला जाणवले की माझी मुलं लाइक्ससाठी वेडे झाले आहेत. तसंच, जो कोणी हे नियम तोडेल त्यांना स्विगी किंवा झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर करण्यास मनाई केली जाईल.
सोशल मीडियावर हा करारनामा शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, माझ्या मावशीने घरातील सर्व सदस्यांच्या या करारावर सह्या घेतल्या आहेत. एका युजर्सने म्हटलं आहे की, मंजू मावशीची परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा पाळताहेत, तर, एकाने लिहलं आहे की, मंजू मावशीने खूप चांगले उदाहरण घालून दिले आहे.