IndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर
एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटमधील तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर बजेट एअरलाइनमध्ये तिच्या सँडविजमध्ये किडे सापडल्याच सांगितलं आहे.
विमान प्रवास आणि प्रवासा दरम्यान दिले जाणाऱ्या आहारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इंडिगो फ्लाइटमध्ये एका महिलेले सँडविचमध्ये चक्क किडे सापडले आहेत. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाणून घ्या नेमकं काय झालं?
दिल्लीस्थित आहारतज्ज्ञ खुशबू गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये 29 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये तिने विकत घेतलेल्या व्हेज सँडविचमध्ये तिला जिवंत किडा कसा सापडला आहे.
राग व्यक्त करताना, गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर आपला संपूर्ण अनुभव शेअर केला. प्रवाशांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी एअरलाइनच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुप्ता यांनी आपली चिंता व्यक्त केली, “सँडविचची गुणवत्ता चांगली नाही हे माहीत असूनही… फ्लाइट अटेंडंटने इतर प्रवाशांना सँडविच सर्व्ह करणे सुरूच ठेवले. तेथे लहान मुले, वृद्ध लोक आणि इतर प्रवासी होते... कोणाला संसर्ग झाला तर?'' गुप्ता यांनी दावा केला की इंडिगो फ्लाइट अटेंडंटला किडे सापडल्याबद्दल माहिती देऊनही, त्यांची प्रतिक्रिया अशी होती की जणू काही मोठी गोष्ट नाही.
गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, फ्लाइट अटेंडंटने विमानातील या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आणि फक्त सांगितले, "आम्ही ते दुसरे काहीतरी देऊ." ही बाब संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देऊ, असे आश्वासन गुप्ता यांना दिले. दरम्यान, विमान कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, क्रूने ताबडतोब प्रश्नातील विशिष्ट सँडविच सेवा देणे थांबवले आहे.
एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमच्या एका ग्राहकाने दिल्ली ते मुंबई या फ्लाइट 6E 6107 मधील अनुभवाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेची आम्हाला जाणीव आहे. आम्ही बोर्डवर अन्न आणि पेय सेवेची सर्वोच्च सेवा देण्यासाठी बंधनकारक आहोत. “तपासानंतर, आमच्या टीमने प्रश्नातील विशिष्ट सँडविचची सेवा त्वरित बंद केली. या प्रकरणाची सध्या कसून चौकशी केली जात आहे.